जो बायडेनचा रशियाला गंभीर इशारा, म्हणाले आता मोठी किंमत चुकवावी लागणार...
Ukraine Crisis: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मंगळवारी जाहीर केले की अमेरिका रशियन बँका आणि oligarchs विरुद्ध कठोर आर्थिक निर्बंध घालण्याचे आदेश देत आहे
वॉशिग्टन: Ukraine Crisis: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मंगळवारी जाहीर केले की अमेरिका रशियन बँका आणि oligarchs विरुद्ध कठोर आर्थिक निर्बंध घालण्याचे आदेश देत आहे. ते म्हणाले की, मॉस्कोने युक्रेनवर हल्ला करून आंतरराष्ट्रीय कायद्याचे खुलेआम उल्लंघन केले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युक्रेनची युद्ध करणार नसल्याच्या दाव्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. पुतिन यांनी आणखी काही कारवाई केल्यास आणखी निर्बंध लादले जातील, असेही त्यांनी सांगितले.
बायडेन म्हणाले की, पूर्वेकडे रशियाची वाढती उपस्थिती लक्षात घेऊन अमेरिका नाटो बाल्टिक मित्र देशांच्या संरक्षणासाठी अतिरिक्त सैन्य पाठवत आहे.
नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग म्हणाले की, रशिया युक्रेनवर लष्करी कारवाई करत आहे. आग्नेय युक्रेनमधील फुटीरतावादी प्रदेशांच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याच्या मॉस्कोच्या निर्णयाचा त्यांनी निषेध केला.
स्टोल्टनबर्ग यांनी रशियाच्या या निर्णयाला तणावात वाढ आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे घोर उल्लंघन म्हटले आहे.
27 सदस्य राष्ट्रांच्या युरोपियन युनियन (EU)ने देखील रशियाच्या युक्रेनमधील कारवायांचा निषेध म्हणून रशियन अधिकार्यांवर प्रारंभिक निर्बंध लादण्यास सहमती दर्शविली आहे. या आर्थिक निर्बंधांमुळे यामुळे रशियाचे नुकसान होणार आहे. असेही युनियनच्या सदस्यांनी म्हटले.