Russia - Ukraine conflict : युक्रेनच्या महिला झाल्या रणरागिणी; मोडणार रशियाचा कणा
देशाच्या संरक्षणार्थ या महिला त्यांची कुटुंबही मागे सोडून धाडसी पाऊल उचलताना दिसत आहेत.
नवी दिल्ली : रशियाकडून सातत्यानं घोंगावणारे युद्धाचे ढग आणि त्यामुळं उदभवलेल्या भीतीदायक परिस्थितीमध्ये सध्या युक्रेन आणि तेथील नागरिक जगत आहेत. पण, देशाचं सैन्य मात्र रशियाला तोंड देण्यासाठी सज्ज झालं आहे. खुद्द राष्ट्रपची वोलोडिमिर जेलेंस्की यांनीही याला दुजोरा दिला आहे.
युक्रेनमध्ये एकाएकी महिला सैन्यात सहभागी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. देशाच्या संरक्षणार्थ या महिला त्यांची कुटुंबही मागे सोडून धाडसी पाऊल उचलताना दिसत आहेत.
सौंदर्यानं घायाळ करणाऱ्या याच महिला आता प्राथमिक युद्धाभ्यास, शस्त्र चालण्याचं प्रशिक्षण, स्वसंरक्षणाचे धडे गिरवताना दिसत आहेत.
महिलांनी सैन्याच येण्याची युक्रेनधील ही पहिलीच वेळ नाही. या देशात असणाऱ्या 30 हजारांहून अधिक महिला सैनिकांमध्ये 20 ते 60 वयोगटातील महिलांचा समावेश आहे.
पुरुष सैन्यांच्या खांद्याला खांदा लावून महिलांची ही तुकडी सध्या देशाच्या रक्षणालाठी पाय घट्ट रोवून उभी आहे. 2014 मध्ये जेव्हा रशियानं क्रिमियावर अधिपत्य मिळवलं होतं तेव्हा या महिला सैनिकांचं साहत पाहता आलं होतं.
युक्रेनच्या सैन्यात 15 टक्के महिला
युक्रेननं 1993 पासून महिलांना सैन्यात स्थान देण्यास सुरुवात केली. सध्याच्या घडीला या देशातील सैन्यामध्ये महिलांची संख्या 15 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
सद्यस्थितीला 1100 महिला वरिष्ठ पदावर सेवेत आहेत. तर, प्रत्यक्ष युद्धासाठी 13000 हून अधिक महिला सज्ज आहेत. परिणामी रशियाच्या सैन्याचं कंबरडं मोडण्यासाठी या महिला पुरेशा पडतील, असंच म्हटलं जात आहे.
सध्या रशिया आणि युक्रेनमधून काही फोटो आणि व्हिडीओ जगासमोर येत आहेत. इथे युक्रेनमधील काही फोटोंमध्ये उतरत्या वयातील महिलाही हातात एके-47 बंदुक घेऊन प्रशिक्षण घेताना दिसत आहेत.
युक्रेमधील महिलांचा संताप आणि देशप्रेमाच्या भावना आता अनावर झाल्या आहेत. ज्यामुळं त्या रशियाला उघ़ड आवाहन देताना दिसत आहेत.
वयस्कर महिलांची वेगळी तुकडी
सूत्रांच्या माहितीनुसार युक्रेनमध्ये 'बाबुश्खा बटालियन' या नावानं वयस्कर महिलांचीही सैन्यात एक तुकडी आहे. ही तुकडी युद्धाच्या वेळी सैन्याला वैद्यकीय मदत, गुप्त माहितीची देवाणघेवाण अशी कामं पाहते.
2014 मध्ये क्रिमियावर रशियानं हल्ला केला तेव्हा सैनिकांसाठी भुयारं खोदण्य़ाचं काम या तुकडीनं केलं होतं.