Russia Ukraine War : रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं आहे.. (Russia Ukraine Conflict) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (vladimir putin) यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आणि युक्रेनमधील शहरांवर हल्ले सुरु झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियाच्या लष्करी कारवाईनंतर युक्रेनमधली परिस्थिती बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर कीवमधल्या भारतीय दुतावासाने युक्रेनमधल्या भारतीयांसाठी नवीन सूचना जारी केली आहे. युक्रेमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी घर सोडू नका, शांत आणि सुरक्षित रहा, सध्याची परिस्थिती अत्यंत अनिश्चित आहे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. 


भारतीय दूतावासाने कीव शहरामध्ये येणाऱ्या सर्वांना आपापल्या शहरात परतण्याचा सल्ला दिला आहे. पुढची सूचना येईपर्यंत कोणीही आपलं घर आणि शहर सोडू नका असं सांगण्यात आलं आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावास सातत्याने युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना युक्रेन सोडून भारतात परतण्याचं आवाहन करत होतं. 


एअर इंडियाच्या विशेष विमानाने आतापर्यंत अनेक भारतीयांना मायदेशी आणण्यात आलं आहे. पण अजूनही अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. युक्रेनमध्ये जवळपास 20 हजार विद्यार्थी शिक्षणानिमित्ताने राहतात. 


रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी गुरुवारी युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर युक्रेनवर बॉम्बहल्ले सुरू झाले आहेत. क्षेपणास्त्रातून हल्ले केले जात आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून युक्रेननेही रशियाची पाच विमानं पाडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मोठे युद्ध होण्याचा धोका वाढला आहे.


दुसरीकडे, सुरक्षा परिषदेत युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा सुरू आहे. अमेरिकेने रशियाला परिणामांचा इशारा दिला आहे, तर पुतीन यांनीही कोणत्याही देशाने हस्तक्षेप न करण्याची धमकी दिली आहे.