युक्रेन रशिया दरम्यान युद्धाचा भडका; युक्रेनच्या पूर्व प्रांतात मोठे ब्लास्ट सुरू
Russia Ukraine crisis LIVE : युक्रेनच्या दोनेत्स्कमध्ये स्पेशल ऑपरेशन करण्याची पुतीन यांनी घोषणा केली आहे. यूक्रेन आर्मीने शस्त्र टाकावी आणि घरी जावे, असे पुतीन यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : युक्रेनच्या दोनेत्स्कमध्ये स्पेशल ऑपरेशन करण्याची पुतीन यांनी घोषणा केली आहे. यूक्रेन आर्मीने शस्त्र टाकावी आणि घरी जावे, असे पुतीन यांनी म्हटले आहे. आमचा यूक्रेनवर कब्जा करण्याचा इरादा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. युक्रेनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने युद्धाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राने (UN) पुतिन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, पूर्व युक्रेनच्या दोनेत्स्कमध्ये बॉम्ब डागणे रशियाने सुरू केल्याचं दिसून येत आहे.
राजधानी कीवमध्ये स्फोट सुरू
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने युद्ध घोषित केल्यानंतर युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदमध्ये यावेळी युक्रेन - रशिया संकटावर बैठक सुरू होती. दरम्यान, रशियाने व्लादिमीर पुतिन यांनी दोनेत्स्कमध्ये सैन्य कारवाईची घोषणा केली आहे.