नवी दिल्ली : युक्रेन आणि रशिया दरम्यान युद्धाचा आजचा 10 वा दिवस आहे. रशियाने युक्रेनची अनेक शहरं बेचिराख केली आहेत. रशियाने युक्रेनवर तुफान हल्ला चढवत आता हवाई वाहतूकही ताब्यात घेतली आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी रशियाच्या विरोधात लढताना आता थेट जगालाही धमकी दिली आहे.


NATO ची मदत नाहीच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाटो देशांनी युक्रेनची मदत करण्यासाठी पुन्हा नकार दिला आहे. NATO ने म्हटलं की, युक्रेनला युद्धात मदत म्हणजे थेट जागतिक महायुद्धाला आमंत्रण देणं आहे. आम्ही युक्रेनची एअरस्पेस मुक्त करू शकत नाही.


नो फ्लाईंग झोनबाबत NATO ची नाराजी


नो फ्लाईंग झोनबाबत झेलेंस्की यांनी NATO वर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, युक्रेनला मदत न करणं या NATO च्या निर्णयाचा अर्थ युक्रेनवर आणखी हल्ले सुरूच राहतील किंवा वाढतीलही.


NATO वर युक्रेनचे परराष्ट्रमंत्री संतापले


युक्रेनचे परराष्ट्रमंत्री NATO देशांवर प्रचंड संतापले. त्यांनी म्हटले की, NATO कमकूवत होतं. काहीही करू शकलं नाही.



झेलेंस्कीची युरोपला धमकी


युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी युरोपीय देशांना संबोधताना म्हटले की, जर आम्ही पडलो, तर तुम्हीही पडाल. आपण जिंकलो तर लोकशाहीही जिंकेल.