नवी दिल्ली : युक्रेनमधल्या शहरांवर ताबा मिळवल्यानंतर रशियान सैनिकांनी तिथं अक्षरशः लूटमार सुरू केली आहे. कीव्हचा काही भाग, खारकीव्ह,मेलिटोपोल या शहरांमध्ये रशियन सैनिकांनी धुडगूस घालायला सुरूवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियाचे सैनिक बँका लुटतायत, तर सुपरमार्केटवरही त्यांनी डल्ला टाकायला सुरूवात केली. याचे व्हिडिओ समोर आलेत. बँकेतून पैशांच्या पेट्या हे सैनिक बाहेर घेऊन येत आहेत. तर सुपरमार्केटमध्ये त्यांनी फुकटात शॉपिंग सुरू केल्याचं दिसतं आहे.


युक्रेन-रशिया युद्धाची आण्विक युद्धाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आहे. न्यूक्लिअर डिटेरन्स फोर्सनं अलर्ट राहावं अशा सूचना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियन सैन्याला दिल्या आहेत. रशियानं अण्वस्त्र परजल्यानं सा-या जगाची चिंता वाढली. 


या युद्धात अण्वस्त्र वापरली गेल्यास मोठ्या प्रमाणात संहार होईल. रेडिअशनची मोठी झळ सा-या जगाला सोसावी लागेल. महत्वाचं म्हणजे रशियानं काही अण्वस्त्र बेलारूसमध्ये तैनात केल्याची माहिती समोर येत आहे.


रशियाच्या या आक्रमक हालचाली लक्षात घेऊन फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी तातडीनं बेलारूसचे अध्यक्ष लुकाशेन्को यांना फोन करून चर्चा केली. रशियाला अशा पद्धतीने आपल्या भूमीचा वापर करू देऊ नका असं फ्रान्सने बेलारूसचे अध्यक्ष लुकाशेन्को यांना बजावलं आहे.