मास्को : Russia Ukraine war : युक्रेनवर रशियाचे आक्रमण एक महिन्याहून अधिक काळ सुरुच आहे. हे आक्रमण थांबताना दिसत नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या आण्विक सैन्याला अलर्ट  केले आहे. त्यानंतर रशियाने आपल्या न्यूक्लियर पाणबुड्या समुद्रात सोडल्या आहेत. त्यामुळे अणुयुद्धाची शक्यताही वाढली आहे.


पाणबुड्या 16 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियन न्यूक्लियर पाणबुड्या एकाच वेळी 16 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहेत. या पाणबुड्या उत्तर अटलांटिक महासागरात उतरवण्यात आल्या आहेत. रशियाच्या या हालचालीबाबत तज्ज्ञांचे मत आहे की क्रेमलिन आपली स्थिती मजबूत करण्यासाठी कोणत्याही थराला जाईल असे दिसते. रशियावर नजर ठेवणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पुतिन आक्रमक रणनीतीसाठी आण्विक धमक्या देत आहेत. 2014 च्या क्रीमिया युद्धादरम्यान त्यांनी असेच केले होते.


द टाइम्सच्या रिपोर्टमद्ये असे म्हटले आहे की, या आण्विक पाणबुड्या लवकरच रशियाकडे परत आल्या आहेत आणि तेव्हापासून स्थिती सामान्य आहे. पण रशियाच्या या कारवाईपासून पाश्चात्य गुप्तचर संस्था क्रेमलिनच्या अण्वस्त्रांच्या साठ्यावर बारीक नजर ठेवून आहेत.


रशिया अण्वस्त्रे वापरणार का?


मिळालेल्या वृत्तानुसार, रशियाने 3 मार्चपासून आपली अण्वस्त्रे हाय अलर्टवर ठेवली आहेत. 22 मार्च रोजी, रशियाने नाटोला धमकी दिली की, जर नाटोने सीमा ओलांडली तर क्रेमलिन अण्वस्त्र हल्ला चुकवणार नाही. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की जर रशियाला "अस्तित्वाचा धोका" असेल तर तो अण्वस्त्रे वापरेल.


रशियाला डॉनबासची मुक्त हवेय


रशियाच्या जनरल स्टाफचे फर्स्ट डेप्युटी चीफ कर्नल जनरल सर्गेई रुडस्कॉय यांनी मीडियाला सांगितले की, सर्वसाधारणपणे ऑपरेशनच्या पहिल्या टप्प्यातील सर्व मुख्य कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता आम्ही मुख्य ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आणि हे मुख्य लक्ष्य डॉनबासची मुक्ती आहे. जोपर्यंत रशियन सैन्य डॉनबास आणि लुहान्स्कला मुक्त करत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.