Russia Ukraine War: सायकलस्वारावर पडला तोफेचा गोळा, 40 सेकंदाचा थरारक व्हिडिओ
रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे, व्हायरल व्हिडिओतून युक्रेनमधल्या भीषणतेचा अंदाज
Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला चढवला आहे. रशिया माघार घेण्याच्या स्थितीत नाही. युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि बॉम्बगोळांचा मारा सुरु असून मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. तिथलं जनजीवन विस्कळीत झालं असून मोठी जिवीतहानी झाल्याचीही माहिती आहे.
युक्रेनची राजधानी कीव्हवर ताबा मिळवण्यासाठी रशियन सैन्याकडून जोरदार हल्ले केले जात आहेत. युद्धाची झळ युक्रेनमधल्या सामान्य माणसांना सहन करावी लागतेय. यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडिआवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
40 सेकांदांचा थरारक व्हिडिओ
व्हायरल होणारा हा व्हिडिओ 40 सेकांदांचा असून या व्हिडिओमधून युक्रेनमधल्या भीषण परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. युक्रेनच्या रस्त्यावरुन एक सामान्य नागरिक सायकवरुन जाताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचवेळी अचानक हवेतून बॉम्ब हल्ला होताना दिसतोय. बॉम्ब हल्ल्यामुळे मोठा स्फोट होऊन सर्वत्र आगीच्या ज्वाला उठताना या सीसीटीव्ही व्हिडिओत दिसत आहे. या स्फोटात त्या सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.
युक्रेन पडलं एकाकी
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटो देशांवर जोरदार आरोप केले आहेत. रशियाविरोधातल्या युद्धात युक्रेनला एकटं पाडल्याचं झेलेन्सकी म्हणाले. युक्रेनवर रशियाने मोठं आक्रमण केलं तरीही, अद्यापर्यत कोणत्याही नाटो संघटनेतील देशाने युक्रेनच्या मदतीत थेट पाऊल उचलेलं नाही. त्यामुळे रशियाच्या युद्धात युक्रेनच्या शहराचे मोठं नुकसान झालं आहे.
युक्रेनचा दावा
असं असतानाही रशियन सैन्याला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचा दावा युक्रेनने केला आहे. (Ukraine says it shot down a Russian aircraft) युक्रेनने रशियाचे 800 सैनिक ठार मारल्याचा दावाही केला आहे. तसेच 7 हेलिकॉप्टर्स पाडल्याचाही दावा केलाय. रशियाचे 30 रणगाडेही उध्वस्त केल्याचा दावा युक्रेनने केलाय.