Anna Galkina Ice Queen: सोशल मिडीयावर बरेच अनोखे आणि चकित करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच एक रशियन मुलगी सोशल मिडीयावर प्रचंड चर्चेत आलेली दिसत आहे. या मुलीचे नाव एन्ना गेल्किना असून ती सोशल मिडीयावर आता चर्चेचा विषय बनली आहे. तिच्या व्हायरल होण्यामागचं कारण सुद्धा तितकंच वेगळं आणि अनोखं आहे. ही रशियन मुलगी बर्फात राहते आणि बर्फ खाऊन स्वत:ची भूक मिटवते. एन्नाचे सोशल मिडीयावर 17 लाखांहून आधिक फोलोवर्स आहेत. बर्फ खाणं तिच्यासाठी सुपरफूडपेक्षा कमी नसल्याचं एन्नाचं म्हणणं आहे. एन्नाच्या मते बर्फ खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरात ताजेपणा राहतो. तिच्या या विचित्र सवयीमुळे सोशल मिडीयावर तिला खूप प्रसिद्धी मिळत आहे. यामुळेच तिला 'आइस क्वीन' असं नाव पडलं आहे. 


बर्फात राहून बर्फ खाऊन मिळवते ताजेपणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एन्नाला लहानपणापासूनच बर्फात खेळण्याची आवड होती, असं तिच्या एका व्हिडीओ मधून कळालं. बर्फात खेळण्याची तिच्या या आवडीचा परिणाम इतका वाढला की ती आता बर्फात राहून बर्फ खाणे पसंत करते. बर्फ खाणे ही तिची फक्त सवयच नाही तर ती आरोग्यासाठी सुद्धा बर्फ खाणं फायदेशीर मानते. एन्नाच्या मते बर्फात मोठ्या प्रमाणात मिनरल्स आणि विविध जीवनसत्त्वे असतात जी शरीरासाठी खूपच फायद्याचे असतात आणि यामुळे मानसिक शांतता सुद्धा मिळते.


 



रशियन मुलीचा हा अनोखा छंद


एन्ना सोशल मिडीयावर तिच्या बर्फ खाण्याच्या आवडीला घेऊन बरेच व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. या व्हिडीओ मध्ये ती आरामात बर्फ खात असताना दिसते. बर्फ खात असताना तिच्या चेहऱ्यावरील समानाधी आणि आनंदी भाव सहज स्पष्ट होतात. तिचे बर्फातील बर्फ खातानाचे व्हिडीओ बघून लोक थक्क झाले आहेत. चकीत करणारे हे व्हिडीओ शेअर करताना मात्र एन्नाला त्यात काहीच गैर वाटत नाही. याउलट एन्ना आपल्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवर मायनस डिग्री तापमान असलेल्या बर्फात अनोखे स्टंट करत असतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. 


शारीरिक तणावापासून आराम मिळवते एन्ना


या तिच्या विचित्र आवडीला सोशल मिडीयावर बऱ्याचजणांनी नापसंती दर्शवली आहे. परंतु, या सगळ्याचा विचार न करता स्वत:ला ज्या गोष्टी केल्याने आनंद मिळतो त्या करण्याकडे जास्त लक्ष देते. ती आपल्या लाइफस्टाइलला घेऊन नेहमी आनंदी असते. एन्नाच्या मते बर्फात राहिल्याने शारीरिक आणि मानसिक तणावापासून दूर राहण्यास मदत होते. तिच्या या छंदामुळे तिला ऊर्जा आणि मानसिक शांतता प्राप्त होते.