मॉस्को : रशियाचं एक विमान मंगळवारी सीरियातील हमेमिम हवाई तळावर उतरत असतानाच कोसळले. या अपघातात त्या विमानातील ३२ जण ठार झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विमानात २६ प्रवासी आणि सहा कर्मचारी होते. धावपट्टीपासून ५०० मीटर उंचावर असताना हे विमान अचानक कोसळले. हा अपघात कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. मात्र विमानातील तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडली असावी, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 


ही दुर्घटना सीरियातल्या किनारी भागातल्या लताकीया या शहराजवळ झाली आहे. रशियाचं लष्करी विमान हमेमिम विमानतळावर उतरत असताना ही दुर्घटना घडली. विमान दुर्घटनेची सखोल चौकशी केली जात असल्याचं रशियाच्या प्रशासनानं सांगितलं आहे.