मॉस्को : मॉस्कोमधून उड्डाण केल्यानंतर एक विमान बेपत्ता झाले होते. दोमेदेदोवो एयरपोर्ट ते सारातोव एयरलाईन्सच विमान 'एंतोनोव वे एएन १४८' मध्ये ६५ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्सनी एकत्र उड्डाण करत होते. उड्डाण केल्याच्या थोड्या वेळातच विमान बेपत्ता झाले होते. 


विमान क्रॅश 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसारस मॉस्कोच्या एग्रुनोवो गावच्या बाहेरच्या भागात विमान क्रॅश झाले. यातील ७१ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती वर्तविण्यात येतेयं.


हे विमान रुस-कजाकिस्तान सीमेजवळ ओर्स्क जात होते. रुसी टीव्ही चॅनल रुसिया २४ ने यासंदर्भातील वृत्त आहे. यामध्ये कोणीही वाचले नसल्याचे सांगण्यात येतंयं 


खराब वातावरण 


 रुसचे वाहतूकमंत्री यासंदर्भात माहिती घेत आहेत. खराब वातावरणामुळे किंवा पायलटच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतयं.