नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी अनौपचारिक रशिया दौऱ्यासाठी सोची येथे पोहोचले. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची त्यांनी भेट घेतली. या अनौपचारिक दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी भारतासाठी रवाना झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतिन पीएम नरेंद्र मोदी यांना एयरपोर्टपर्यंत सोडण्यासाठी देखील आले होते. पीएम मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना भारतात होणाऱ्य़ा 19व्या शिखर संम्मेलनासाठी आमंत्रित केलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांचं जोरदार स्वागत केलं. यानंतर दोन्ही देशांच्या प्रमुखांना नौका विहार देखील केली. पंतप्रधान मोदी यांचा हा अनौपचारिक दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्यादरम्यान कोणतेही करार नाही झाले.



पीएम मोदी यांनी पुतिन यांना म्हटलं की, 'पहिल्यादा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर तुम्ही भारतात आले होते. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. त्या दरम्यान तुम्ही भारताला जीवंत लोकशाही म्हटलं होतं. याबाबत आजही लोकांमध्ये याची आठवण आहे. भारत आणि रशिया जुने मित्र आहेत. दोन्ही देशांमधील नातं अतूट आहे.'