रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जर्मनीच्या माजी चॅन्सेलर अँजेला मर्केल यांची जाहीर माफी मागितली आहे. 2007 मध्ये त्यांच्या पाळीव प्राण्याला लॅब्राडोरला भेटायला आणले तेव्हा त्यांना घाबरवण्याचा त्यांचा हेतू नव्हता असं स्पष्टीकरण दिलं आहे. अँजेला मर्केल यांना प्राण्यांची भिती वाटते हे तसं जगजाहीर आहे. दरम्यान मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या आत्मचरित्रात पुतिन यांच्यासह झालेल्या एका चिंताजनक भेटीची आठवण त्यांनी सांगितली आहे. पुतिन यांनी आपल्या शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी पाळीव प्राण्याला समोर आणल्याचा आणि त्यांच्या अस्वस्थतेचा आनंद घेतल्याचा आरोप केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"त्यांना श्वानांची इतकी भीती वाटते याची मला कल्पना नव्हती," असं पुतिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. "मी आज पुन्हा एकदा मीडियाच्या माध्यमातून आवाहन करु इच्छित आहे. अँजेला मला माफ करा. मला तुम्हाला कोणताही त्रास द्यायचा नव्हता. याउलट मी मैत्रीपूर्ण संभाषणाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत होतो," असं पुतिन म्हणाले आहेत. 


जर तुम्ही परत कधी दौऱ्यावर आलात, ज्याची शक्यता कमी आहे, मी कोणत्याही स्थितीत पुन्हा तसं करणार नाही असं आश्वासनही पुतिन यांनी दिलं आहे.


रशियन शहरातील सोचीमध्ये 2007 साली झालेल्या बैठकीच्या फोटोंमध्ये पुतिन यांचा काळा लॅब्राडोर रिट्रिव्हर कोन्नी आजूबाजूला फिरताना दिसत आहेत. यावेळी पुतिन खुर्चीवर बसून हसताना दिसत होते. मर्केलने यांनी 2007 मधील या घटनेला उजाळा देत सांगितलं की, "मी पुतिन यांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून सांगू शकते की ते परिस्थितीचा आनंद घेत होते."


पुतिन यांना श्वानांची फार आवड असून, शौकीन म्हणून ओळखले जातात. अनेक प्रसंगी मान्यवरांनी त्यांना श्वान भेट म्हणून दिले आहेत. सर्गेई शोइगु यांच्याकडून भेट म्हणून त्यांनी कोन्नी मिळाला, जो नंतर त्यांचा संरक्षण मंत्री झाला.