Secret Daughters म्हणून पुतीनच्या मुलीची चर्चा, जगापासून लपवतोय कुटूंब
पुतीन यांनी आपलं कुटूंब का ठेवलं लपवून, या गोष्टींचे चाहते आहेत पुतीन
मुंबई : जगभरात सध्या चर्चा आहे ती फक्त रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाची. गुरूवारी एका लाईव्ह कार्यक्रमात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी युक्रेनमध्ये 'स्पेशल मिलिटरी ऑपरेशन' ची घोषणा केली आहे.
यानंतर रशियाने भारताच्या वेळेनुसार सकाळी ८.३० वाजता यूक्रेनवर हल्ल्याची घोषणा केली. व्लादिमीर पुतीन यांचा जन्म १९५२ साली सेंट पीटर्सबर्ग येथे झाला. पुतीन १९७५ साली रशियाच्या सीक्रेट एजन्सी केजीबीमध्य सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतीपर्यंतचा पल्ला गाठला.
एकेकाळी सिक्रेट एजंट असलेले पुतीन यांच खासगी आयुष्य देखील खूप सिक्रेट आहे. पुतीन यांनी आपल्या मुली आणि संपूर्ण कुटुंब हे कायमच गुलदस्त्यात ठेवले.
खूप सिक्रेट आहे पुतीनचं कुटूंब
द सनच्या रिपोर्टनुसार, व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) सार्वजनिक ठिकाणी आपल्या कुटुंबाचा आणि मुलींचा उल्लेख करणं टाळतात. पुतीन यांना दोन मुली आहे. ज्यांचं नाव मारिया आणि कतरिना असं आहे. मारिया आणि कतरिना असं या मुलींचं नाव आहे.
मेडिकल रिसर्चर आहे मारिया
व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin)यांची मुलगी मारिया ही एक मेडिकल रिसर्चर आहे. मॉस्कोमध्ये डच पती जॅरिट फासेनसोबत राहते मारिया. त्यांना एक मुलगा देखील आहे.
दुसरी मुलगी कतरिना ऐक्रोबॅट डान्सर
कतरिना (Katerina Tikhonova) एक ऐक्रोबैट डांसर आहे. तसेच ती मॉस्को स्टेट यूनिवर्सिटीवर मोठ्या पदावर कार्यरत आहे. ती १.७ अरब डॉलरसोबत स्टार्टअप चालवते. २०१७ मध्ये रशियाचे अरबपती किली शॅमलॉवसोबत लग्न केलं. मात्र दोघांचा यावर्षी घटस्फोट झाला आहे.
पुतीनचे सफाई कर्मचाऱ्यासोबत होते संबंध
२०२० मध्ये खुलासा झाला होता की, व्लादिमीर पुतीनचे एका सफाई कर्मचारी महिलेसोबत संबंध होते. जी आता करडोंची मालकिन आहे. स्वेतलाना क्रिवोनोगिख (Svetlana Krivonogikh) नावाच्या महिलेसोबत ९० च्या दशकात संबंध होते. २००३ साली दोघं एकमेकांपासून वेगळे झाले.
स्वेतलाना आणि पुतीनची मुलगी
स्वेतलाना क्रिवोनोगिख (Svetlana Krivonogikh) आणि व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना १८ वर्षांची मुलगी आहे. ज्याचा खुलासा गेल्यावर्षी झाला. येलिजावेटा व्लादिमीरोवना उर्फ लुईजा (Luiza)हीच्या जन्मानंतंर पुतीन आणि स्वेतलाना वेगळे झाले.
सफाई कर्मचारी ते करोडपती महिला
४५वर्षीय स्वेतलाना क्रिवोनोगिख (Svetlana Krivonogikh) ९० च्या दशकात व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना भेटली. तेव्हा ती सफाई कर्मचारी होती. मात्र आता ती करोडोंची मालकिन आहे.
लुईजावर उडवतात करोडो पैसा
व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) १८ वर्षांच्या लुईजा (Luiza) वर भरपूर पैसा उडवतात. लुईजा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहे. ती आपल्या लक्झरी लाइफस्टाइलमुळे कायमच चर्चेत असते.
पुतीन ३७ वर्षांच्या जिम्नास्ट एलिना करतायत डेट
व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचं नातं ३७ वर्षीय माजी जिम्नास्ट एलिना काबायेवा (Alina Kabaeva) ला डेट करत आहे. एलीना एक जिम्नास्ट असून किने ऑलम्पिकमध्ये दोन वेळा गोल्ड मेडल, १४ विश्व चॅम्पियनशिप आणि २५ यूरोपीय चॅम्पियनशिप जिंकली आहे. खेळातून निवृत्त झाल्यावर एलिना राजकारणाकडे वळली आहे. पुतीन यांच्या यूनायटेड रशिया पार्टीची खासदार बनली.
पुतीनने २०१३ साली घेतला घटस्फोट
व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) ने १९८३ साली ल्यूडमिला शक्रेबनेवा (Lyudmila Shkrebneva) यांच्यासोबत लग्न केलं. ल्यूडमिला आणि पुतीन यांना दोन मुली आहे. ज्यांचं नाव मारिया कतरीना असं आहे. २०१३ साली यांचा घटस्फोट झाला.
व्लादिमीर पुतीन यांची संपत्ती
द सन की रिपोर्टनुसार, व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची संपत्ति १६० अरब पाउंड म्हणजे जवळपास 16555 अरब रुपये आगे. तसेच पुतीन हे कार, जहाज आणि गु्प्त महलांचे मालक आहेत.