Satellite Blast Near ISS: अंतराळातील प्रत्येक लहानमोठ्या हालचालींकडे जगातील बऱ्याच अंतराळ संशोधन संस्थांची नजर असताना गेल्या काही दिवसांपासून या सर्व अंतराळ  संशोधन संस्थांचं लक्ष नासाच्या एका मोहिमेसाठी अंतराळात गेलेल्या भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर या अवकाशयात्रींच्या परतीच्या प्रवासाकडे लागलं आहे. इथं त्यांच्या परतीच्या प्रवासात असंख्य अडचणी निर्माण होत असतानाच तिथं अंतराळात एका मोठ्या स्फोटामुळं हाहाकार माजल्याचं म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतराळात झालेला हा महाभयंकर स्फोट रशियाच्या एका उपग्रहाचा असून, हा स्फोट इतका भयंकर होता, की उपग्रहाच्या चिंधड्या झाल्या. प्राथमिक माहितीनीनुसार जिथं स्फोट झाला ती जागा International Space Station पासून बरीच जवळ होती. ज्यामुळं स्पेस स्टेशनमध्ये असणाऱ्या अंतराळवीरांनी यावेळी जीव वाचवण्यासाठी सेफ हाऊसमध्ये पळ काढला. हे सेफ हाऊस म्हणजे एक प्रकारचं अंतराळयान असून, इथंच ते कैक तासांसाठी लपून राहिले. 


हेसुद्धा वाचा : महिला पुरुषांहून जास्त आळशी? अर्ध्याहून अधिक भारतीय करताहेत 'ही' घोडचूक, WHO चा इशारा 


स्फोट झालेल्या रशियन उपग्रहाचं नाव RESURS-P1 असून, 2022 मध्येच हा उपग्रह निकामी असल्याचं घोषित करण्यात आलं होतं. बुधवारी या उपग्रहाचा भयंकर स्फोट होऊन तो क्षणात उध्वस्त झाला.