महिला पुरुषांहून जास्त आळशी? अर्ध्याहून अधिक भारतीय करताहेत 'ही' घोडचूक, WHO चा इशारा

Health Updates : आरोग्याची ऐशी की तैशी; तुम्हीही या भारतीयांपैकी एक आहात? जाणून घ्या बातमी तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी...   

सायली पाटील | Updated: Jun 28, 2024, 09:14 AM IST
महिला पुरुषांहून जास्त आळशी? अर्ध्याहून अधिक भारतीय करताहेत 'ही' घोडचूक, WHO चा इशारा  title=
health news 50 percent adults in India are physically inactive in 2022 says lancet report

Health Updates : आरोग्याच्या बाबतीत मागील काही वर्षांमध्ये बरीच मंडळी सजग झाली असून, आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्या प्रयत्नांत असल्याचं स्पष्ट होत आहे. पण, भारतीय खरचं स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतायत? ग्लोबल हेल्थ मॅग्जिन लँसेटनं भारतीयांसंदर्भातील एक अतीव महत्त्वाची माहिती नुकतीच शेअर केली आहे. या माहितीनुसार भारतीयांचा आरोग्याकडे पाहण्याचा एकंदर दृष्टीकोन आणि त्यामुळं वाढणाऱ्या चिंतेनं सध्या सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

लँसेटच्या अहवालानुसार जवळपास 50 टक्के प्रौढ भारतीय आळसाच्या इतके आहारी गेले आहेत की, दैनंदिन जीवनात त्यांच्याकडून किमान श्रमही केले जात नाहीत. यामध्ये भारतीय महिलांचा आकडा 57 टक्के असून, या महिला शारीरिकदृष्ट्या पुरेशा सक्रिय नसल्याची माहिती समोर आली असून, या बाबतीत पुरुषांची आकडेवारी तुलनेनं 42 टक्के इतकी आहे. 

पुरेशा प्रमाणात शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणाऱ्या महिलांमध्ये दक्षिण आशियायी प्रांतात महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत 14 टक्क्यांनी जास्त असून, भारतातही जवळपास हीच परिस्थिती आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार निरीक्षणकर्त्यांनी शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणाऱ्यांची आकडेवारी घेत त्यावरून पुढील निष्कर्ष काढले. ज्यामध्ये जगभरात जवळपास एक तृतीयांश भारतीय किमान शारीरिक श्रम करणंही टाळतात आणि आरोग्याच्या बाबतीत ही एक घोडचूकच आहे  हे वृत्त समोर आलं. 

हेसुद्धा वाचा : बापरे! शिवारातील विहीर खचल्यानं पती- पत्नी ढिगाऱ्याखाली; घटनास्थळाची दृश्य विचलित करणारी 

जाणकारांच्या मते भारतात शारीरिक कष्ट, हालचाली, व्यायाम करणाऱ्यांचा आकडा असाच वाढत राहिला, तर 2030 पर्यंत अशा व्यक्तींचा आकडा 60 टक्क्यांवर पोहोचेल आणि आरोग्याच्या अनेक समस्या, शारीरिक व्याधी उद्भवतील. शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय असणाऱ्यांमध्ये मधुमेह आणि हृदयविकाराच्या समस्या वाढत असून, उच्च रक्तदाबाची समस्याही अनेक भारतीयांना भेडसावत आहे. त्यामुळं वेळीच योग्य पावलं उचलत आरोग्याला केंद्रस्थानी ठेवणं ही काळाजी आणि भारतीयांची गरज आहे. 

अभ्यासकांच्या मते पुरेसे शारीरिक श्रम करणाऱ्यांमध्ये आठवड्यातून जवळपास 150 मिनिटं मॉडरेट श्रेणीतील व्यायासम किंवा आठवड्यात 75 टक्के हाय इंटेन्सिटी या श्रेमीतील व्यायाम करण्याची सवय असाली. सदर अहवालातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार 2010 मध्ये शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणाऱ्या प्रौढांची संख्या 26.4 टक्के इतकी होती. 2022 मध्ये ही आकडेवारी वाढून थेट 50 टक्क्यांवर पोहोचली.