मुंबई : रशियाची कोरोना लस स्पुतनिक व्ही Omicron प्रकाराविरूद्ध प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. भारतातही ही लस कोरोना लसीकरणासाठी वापरली जात आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) ने कोरोनाच्या नवीन स्ट्रेन विरूद्ध या लसीच्या प्रभावीतेबद्दल माहिती दिली आहे. ( Russia's corona vaccine Sputnik V has been found to be effective against the Omicron variant )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी आपल्या निवेदनात म्हटले की, रशियाची स्पुतनिक व्ही (Sputnik V) लस ओमायक्रॉन प्रकाराविरूद्ध मजबूत अंटीबॉडिज तयार करतात. पुढे स्पुतनिक लाइट बूस्टर आणखी त्याला मजबूत करते.


गमलेया सेंटरच्या प्राथमिक प्रयोगशाळेच्या अभ्यासात असे सूचित होते की, स्पुतनिक व्ही ओमायक्रॉन विरुद्ध मजबूत प्रतिकारशक्ती प्रदान करते. गंभीर आजार रोखण्यासाठी आणि रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्यापासून वाचवण्यासाठी ही लस प्रभावी ठरेल, असा विश्वास आहे. गमलेया सेंटरने स्वतः ही लस तयार केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 27 नोव्हेंबर रोजी B.1.1.1.529 या नवीन प्रकाराला Omicron असे नाव दिले. या प्रकारात मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन आढळून आले आहे, त्यामुळे याला चिंतेचे प्रकार म्हणून घोषित करण्यात आले आहे.


अशी भीती आहे की अधिक उत्परिवर्तनांमुळे आरोग्य विभागावर ताण वाढू शकतो. पण लसीद्वारे निर्माण होणारी प्रतिकारशक्ती त्याला टाळू शकते. अशा परिस्थितीत रशियन लस या प्रकाराविरूद्ध प्रभावी असल्याचे समोर आले आहे. गमलेया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने विकसित केलेली स्पुतनिक व्ही ही नोंदणीकृत जगातील पहिली लस होती. व्हायरल वेक्टर लस. संसर्ग नष्ट करण्यासाठी निष्क्रिय व्हायरसचा वापर केला जातो. Sputnik V लसीमध्ये एडेनोव्हायरसचा वापर केला गेला आहे.


फेज-3 क्लिनिकल ट्रायल्समध्ये कोरोना संसर्गाविरूद्ध स्पुतनिक व्ही लस 91.6 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले. त्याची माहिती जगप्रसिद्ध मेडिकल जनरल लॅन्सेटमध्ये देण्यात आली आहे. रशियामधील 3.8 दशलक्ष लोकांच्या चाचणी डेटाच्या विश्लेषणानुसार, स्पुतनिक V 97.6 टक्के प्रभावी असल्याचे आढळले. ही लस गंभीर कोरोना संसर्गापासून 100 टक्के संरक्षण प्रदान करते.