Same-Sex Marriage Bill Passed By US Senate: समलिंगी जोडप्यांसाठी (Same-sex couples) आनंदाची बातमी आहे. आता ते अजून एका देशात जाऊन विवाह (marriage) करु शकतात. कारण अमेरिकेने (America) समलिंगी विवाहाला संरक्षण देणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. मंगळवारी अमेरिकेत झालेल्या सिनेटमध्ये (US Senate) समलिंगी विवाहच्या विधेयकाच्या समर्थनार्थ राष्ट्राध्यक्ष जो बायडेन  (Joe Biden) यांनी मतदान करत एक ऐतिहासिक निर्णय घेतला. 


प्रेम हे प्रेम असतं! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेमात (Love) वय, रंग, धर्म यात कसलही बंधन नसतं. पण जेव्हा गोष्ट समलिंग जोडप्याची यायची तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात. पण बायडेन यांनी प्रेम हे प्रेम असतं आणि अमेरिकन लोकांना त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करता यावं, असं मत मांडतं त्यांनी सर्वांची मनं जिंकली. जेव्हा हे विधेयक सिनेटमध्ये मांडण्यात आलं तेव्हा त्याच्या समर्थनार्थ 61 तर विरोधात 36 मतं पडली. 


हेही वाचा -  Photoshoot : पालकांनी नाकारलं, कोर्टाने न्याय दिला; 'या' Lesbian Couple फोटोशूटची सर्वत्र चर्चा



अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला 2015 मध्ये कायदेशीर मान्यता दिली होती. अमेरिकत पाच लाख 68 हजार विवाहित समलैंगिक जोडपी राहतात. दरम्यान भारतात अजूनही समलैंगिक विवाहसाठी जोडप्यांची लढाई सुरु आहे. नुकतच केरळच्या फातिमा नूरी आणि आदिला नसरीन (Kerala Lesbian Couple Photoshoot) यांनी अलुवा इथे जाऊन विवाह केला. त्यांचा लग्नाचे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. 


समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा तैवान हा आशिया खंडातला पहिला देश आहे. तैवानमध्ये समलेैंगिक विवाहाचा कायदा लागू करण्यात यावा यासाठी ची चिया वेई यांनी सुमारे 30 वर्षे लढा दिला. त्यांनी 2015 मध्ये कोर्टात यासंबंधीची एक याचिकाही दाखल केली होती. अखेर 2019 मध्ये या देशात समलैंगिक विवाहाला मंजुरी देण्यात आली.