नवी दिल्ली : सौदी अरेबियाने सध्या कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रकरणांमुळे पाकिस्तानसह 20 देशांमधील हवाई वाहतूक स्थगित केली आहे. आता केवळ तेच लोक जे त्यांचं नागरिक आहेत, डॉक्टर किंवा त्यांचे नातेवाईक सौदी अरेबियामध्ये प्रवेश करू शकतात. हा आदेश 3 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आला आहे. सौदी अरेबियाने संयुक्त अरब अमिरात, जर्मनी, अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, इजिप्त, लेबनॉन आणि भारत या देशांतील लोकांना बंदी घातली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौदी अरेबियाच्या स्टेट न्यूज एजन्सीच्या मते, 21 डिसेंबर 2020 रोजी सौदी अरेबियाने परदेशात जाण्यासाठी आणि तेथून जाणारी उड्डाणे थांबविली. ते पुन्हा 28 डिसेंबर रोजी वाढविण्यात आले. कोरोनाचा नवीन विषाणू आल्यानंतर सौदीने हे निर्णय घेतले होते. त्यानंतर त्यांनी 4 जानेवारी रोजी ही स्थगिती उठवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा 20 देशांमधील विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.


सौदी अरेबियामध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूची 368,639 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी 6,383 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 360,110 रुग्ण बरे झाले आहेत.


पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूच्या निर्मूलनासाठी सरकारने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. याची सुरुवात 2 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या उपस्थितीत झाली आणि त्याची पहिली लस इस्लामाबाद रूग्णालयाच्या प्रमुखांना दिली गेली. चीनकडून सिनोफर्मची कोरोना लस मिळाल्यानंतर पाकिस्तानने याची सुरूवात केली आहे. या पुरवठ्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चीनचे आभार मानले आहेत.