जेद्दा : जगातील सर्वात उंच आणि सर्वात भव्य इमारत बांधण्याच्या स्पर्धेत सौदी अरेबिया देखील सहभागी झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मक्का मदिना या धार्मिक स्थळांमुळे जाणला जाणार देश आता आता जगातील सर्वांत उंच इमारत बांधत आहे. जेद्दा येथे या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.


जगातली सर्वात उंच इमारत


"जेद्दा टॉवर" नावाच्या इमारतीची उंची 3,280 फूट (एक हजार मीटर) असेल. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, सौदी अरेबिया जगातील सर्वात उंच इमारत बांधण्याचा विक्रम मोडणार आहे. सध्या दुबईमध्ये सर्वात मोठई इमारत आहे. दुबईतील बुर्ज खलिफा या सर्वात उंच इमारतीची उंची सुमारे 2,700 फूट आहे.


अलीकडेच या टॉवरच्या बांधकामाचा फोटो समोर आला आहे. आतापर्यंत 826 फूट उंचीचे काम पूर्ण झाले आहे आणि ते काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बांधकाम करणारी जेद्दाह इकॉनॉमिक कंपनीने म्हटलं आहे की, 2020 मध्ये हे काम पूर्ण होईल आणि सामान्य जनतेसाठी खुले केले जाईल.


हे असेल आकर्षण


252 मजल्याचा हा टॉवर जगातील सर्वात उंच निरीक्षण डेक असेल. आपण 2,178 फूट उंचीवरुन संपूर्ण सौदी अरेबिया तुम्ही येथून पाहू शकता. याशिवाय, जेद्दाह टॉवरवरील लिफ्ट 2,165 फूट पर्यंत जाईल त्याच वेळी, डबल डेकर लिफ्ट लोकांना थेट पहिल्या तळापासून अवलोकन डेकपर्यंत घेऊन जाईल. अपार्टमेंट, पंचतारांकित हॉटेल, शॉपिंग मॉल्स, सात मजल्यापर्यंत कार्यालये देखील येथे असणार आहेत.


इमारतीची वैशिष्टे


- 3,281 फूट उंची - 2020 पर्यंत होणार तयार


- 1.4 अब्ज डॉलर्स (8,938 कोटी) बांधकामावर खर्च सध्याचा रेकॉर्ड म्हणजे बुर्ज खलीफा सुमारे 2,700 फूट उंची


- वायूचा दाब कमी करण्यासाठी ती त्रिकोण आकाराची असेल.


सर्वात उंच "जेद्दा टॉवर"


- जेद्दा टॉवर, सौदी अरेबिया (2020 पूर्ण होईल काम): 3,280 फूट


- बुर्ज खलिफा, दुबई (2010 मध्ये बांधकाम): 2,716 फूट


- तैपेई 101, तैवान (2004 मध्ये बांधकाम): 1,666 फूट


- शांघाय WFC, शांघाय (2008 मध्ये बांधकाम): 1,614 फूट


- आंतरराष्ट्रीय वाणिज्य केंद्र, हाँगकाँग (2010 मध्ये बांधकाम) 1,587 फूट