सौदी अरेबिया : स्थानिक नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य मिळावं, या दृष्टीने सौदी अरेबियात सरकारने काही योजनांमध्ये सुधारणा केली आहे. परिणामी तिथल्या छोट्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक भारतीय कामगारांवर बेकार होण्याचे संकट घोंघावत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१६ मध्ये सौदी अरेबियात काम करणाऱ्या भारतीयांची संख्या सुमारे २५ लाख इतकी होती. त्यातील बहुसंख्य कामगार बांधकाम आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आहेत. नव्या योजनेनुसार, प्लॅटिनम आणि हाय ग्रीन गटात येणाऱ्या कंपन्यांना ब्लॉक व्हिसासाठी अर्ज करण्याची परवानगी मिळणार आहे. सौदीतील जास्त नागरिक ज्या कंपन्यांमध्ये आहेत, त्यांचा समावेश या गटात होतो. 


४० टक्क्यांपेक्षा जास्त स्थानिक कर्मचारी असलेल्या कंपन्या प्लॅटिनम गटात येतात. तर भारतीय नागरिक ज्या कंपन्यांमध्ये काम करतात त्या बहुतांशी कंपन्या यलो, रेड, ग्रीन मीडियम किंवा लो या गटात मोडतात. या कंपन्यांना ब्लॉक व्हिसा मिळू शकणार नाही या गोष्टीचा फटका भारतीय कामगारांना बसेल. या भारतीयांना अन्य कंपनीतही काम मिळू शकणार नसल्याची तरतूद योजनेत आहे. 


सौदीतील भारतीय नागरिकांमध्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि केरळमधील जास्त लोक आहेत. त्यांच्या डोक्यावर सप्टेंबरपासून टांगती तलवार राहणार आहे.