आकाशातून पृथ्वीवर येतंय मोठं संकट; GPS सिग्नल, मोबाईल नेटवर्कही होऊ शकते ठप्प
नासा (NASA)च्या सोलर डायनेमिक्स आब्जर्वेटरी (Solar Dynamics Observatory)ने सुर्यातून निघणाऱ्या सौर वादळाला (Solar Flare) ला टिपले आहे.
मुंबई : नासा (NASA)च्या सोलर डायनेमिक्स आब्जर्वेटरी (Solar Dynamics Observatory)ने सुर्यातून निघणाऱ्या सौर वादळाला (Solar Flare) ला टिपले आहे. हा Solar Flare मोठ्या सौर वादळाचा संकेत मानला जात आहे. नासाच्या मते, Solar Flare शनिवारी (30 ऑक्टोबरला) पृथ्वीला धडकू शकतो.
सुर्याच्या केंद्रातून येतंय सौर वादळ
Solar Flare बाबत नासाने म्हटले की, ही Solar Flare हे AR2887 या सनस्पॉटमधून येत आहे. सनस्पॉटच्या माध्यमातून पृथ्वीच्या दिशेने येणारं हे सौर वादळ कोणते मोठे नुकसान करू शकते का हे ठरवता येणार आहे.ॉ
स्पेसवेदर डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, या सौर वादळाचा परिणाम काही तास राहील असं तज्ज्ञांनी म्हटलंय. 28 ऑक्टोबरला 11 वाजून 35 मिनिटांनी सुर्यावर एक स्फोट झाला. त्यामुळे हे वादळ निर्माण झाल आहे. हे सौर वादळ सुर्याच्या केंद्रापासून येत आहे. याची प्रचंड प्रकाश किरणे सरळ पृथ्वीवर पडू शकतात.
मोठ्या रेडियो ब्लॅकआऊटची शक्यता
या सौर चक्रीवादळाला X1 Category मध्ये ठेवण्यात आले आहे. जे शनिवारी पृथ्वीच्या चुंबकिय क्षेत्राशी धडकू शकते. या सौरवादळामुळे मोठे ब्लॅकआऊट होऊ शकते. US Spcace Weather Prediction Center च्या मते, त्याचा परिणाम दक्षिण अमेरिकेत दिसू शकतो.
कम्युनिकेश सिग्नलवर होऊ शकतो परिणाम
वैज्ञानिकांच्या मते, सुर्याच्या केंद्रातून निघणाऱ्या तिक्ष्ण सौर वादळं ही रेडिएशनचा शक्तिशाली विस्फोट आहेत. परंतु हे तिक्ष्ण रेडिएशन पृथ्वीच्या वातावरणाला पार करून मानवाला धोका निर्माण करू शकत नाही. परंतु त्यामुळे वातावरणाच्या लेअरमध्ये जीपीएस आणि कम्युनिकेशन सिग्नलवर परिणाम होऊ शकतो.