मुंबई: असं म्हणतात मृत्यू हा कधीच सांगून येत नाही. जेव्हा येतो तेव्हा त्याचा पत्ताही कोणाला लागत नाही. आपला मृत्यू कधी होणार आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकात असते. सुप्त मनात ही उत्सुकता आता तुम्हाला कळू शकणार आहे. याचं कारण म्हणजे तुमच्या मृत्यूची तारीख तुम्हाला सांगणारं एक नवं तंत्र शोधून काढण्यात आलं आहे. त्याचा वापर करून तुम्हाला तुमचा मृत्यू कधी होणार हे समजू शकणार असल्याचा दावा केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, Risk Evaluation for Support: Predictions for Elder-Life in the Community Tool (RESPECT)  असं नाव देण्यात आलं आहे. ह्याला ऑनलाइन कॅलक्युलेटरही म्हटलं जातं. हा 6 महिने आधीच तुमचा मृत्यू कधी होणार याचा अलर्ट देण्यासाठी सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. 


संशोधनात करणाऱ्या वैज्ञानिकांच्या मते, एखाद्या व्यक्तीची दैनंदिन जीवनाची कामे करण्याची क्षमता कमी होणे हे त्याच्या मृत्यूचे लक्षण मानले जाते. परंतु हे ऑनलाइन कॅल्क्युलेटर वृद्ध लोकांच्या बदलत्या गरजा समजून घेण्यास आणि कुटुंबांना व्यक्तीची काळजी घेण्यासाठी जास्त फायदेशीर ठरणार आहे. 


उदाहरण दाखल ब्रूअर रिसर्च इन्स्टिट्यूट आणि कॅनडामधील ओटावा विद्यापीठातील संशोधक डॉ.एमी सू म्हणाले, 'हे प्रौढ मुलाच्या नियोजनसाठी फायदेशीर ठरू शकतं. कामावरून कधी विश्रांती घ्यावी किंवा पालकांसह कौटुंबिक सुट्टी कधी घ्यावी यासारखे अनेक प्रश्न असतात. यावेळी हे कॅलक्युलेटर आपल्याला त्यासाठी मदत करणारं ठरेल असाही दावा त्यांनी केला आहे. त्यांना सर्व गोष्टींचं नियोजन करण्यासाठी याची मदत होऊ शकते.'


हे कॅलक्युलेटर तयार केल्यानंतर वैज्ञानिकांनी साधारण 4,91,000 अधिक वृद्ध लोकांवर रिसर्च केला. त्यामधून मिळालेली माहिती गोळा केली आणि त्यातून निष्कर्ष काढण्यात आला आहे. 2017 आणि 2013 दरम्यान घरात काळजी घेणाऱ्या वृद्धांना केंद्रीत करण्यात आलं. ज्यांचा पुढचा 5 वर्षांत मृत्यू होण्याची शक्यता आहे अशा वृद्धांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं होतं. 


ऑनलाइन कॅलक्युलेटरचा उपयोग करणाऱ्या लोकांना स्ट्रोक, हाइपरटेंशन यांसारख्या वेगवेगळ्या आजारांबद्दलची माहिती विचारली जाते. जो आजार आपल्याला असेल तो तिथे अपडेट करायचा आहे. याशिवाय निर्णय घेण्याची क्षमता, उल्ट्या, सूज, आणि श्वास घेण्यात अडथळा, भूक यासारख्या अनेक गोष्टींची नोंद करावी लागणार आहे. त्यानंतर हे कॅलक्युलेटर तुम्हाला योग्य तीन माहिती देऊ शकेल.