Scorpian Poison Business: आपला डंख आणि विषासाठी कुख्यात विंचवाला जगभरातील अनेक देशांमध्ये मुद्दाम पाळलं जातं. विंचवाच्या विषापासून विविध औषधं बनवली जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विंचवांचं विष हे अनेक आजारांवर उत्तम उपाय म्हणून काम करतं. तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल, पण विंचवांच्या एक लिटर विषाची  किंमत तब्बल 1 कोटी US डॉलर्स इतकीही आहे. 


विंचवांच्या ब्रिडींगची लॅब 


दक्षिण-पूर्व तुर्कीमधील सानलिउर्फा प्रांत हा विविध संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. इथेच विंचवाची एक ब्रीडिंग लॅब देखील आहे. इथे हजारो विंचू पाळले जातात. तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही, पण इथं तब्बल 20 हजार विंचू आहेत. 


विंचवाच्या विषाचा व्यवसाय 


हे विंचू इथे पाळण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या विषाचा व्यवसाय. या विंचवांचं विष काढून विकण्यासाठीच इथे ही लॅब उभारण्यात आली आहे. विविध औषधांमध्ये याचा वापर होत असल्याने, या विंचवांच्या विषाला कोट्यवधींची किंमत मिळते. 


विंचवांच्या अनेक प्रजाती 


जगभरात विंचवांच्या अनेक अनेक प्रजाती आहेत. यामध्ये आफ्रिकन विंचू, आशियायी विंचू सर्वसाधारणपणे सर्वांना ठाऊक आहेत. मात्र नुकतीच तुर्कस्तानच्या प्रजातीबाबतही माहिती समोर आली आहे. 


अत्यंत बारकाईने काढलं जातं विष 


अत्यंत सुक्ष्म चिमटे किंवा हत्यारांनी या विंचवांमधील विष काढलं जातं. विंचवान आधी त्यांच्या बॉक्समधून बाहेर काढलं जातं. त्यानंतर विविध प्रकारच्या सुया आणि चिमट्यांच्या साहाय्याने त्यांचं विष काढलं जातं. काढलेलं विष बाटल्यांमध्ये अत्यंत सुरक्षित पद्धतीने साठवलं जातं. 


दररोज 2 मिलिग्रॅम विष 


या विषाला फ्रिजमध्ये ठेवण्याआधी नीट जमा करावं लागतं. यानंतर त्याचं चूर्ण बनवून त्याची विक्री केली जाते. एक दिवसाला एक विंचू साधारणतः 2 मिलिग्रॅम विष तयार करतो. यांनी 2 मिलिग्रॅम विषाचं चूर्ण तयार होतं. 


औषधं आणि कॉस्मॅटिक्समध्ये वापर 


फ्रान्स, जर्मनी, ब्रिटनसह अनेक युरोपियन देशांमध्ये विंचवांच्या विषाची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. इथं या विषापासून अनेक प्रकारच्या पेन किलर्स, अँटिबायोटिक, कॉस्मॅटिक्स बनवले जातात. 


विषाचा धंदा आहे मोठा 


केवळ विंचूच नव्हे, यासोबतच साप आणि इतर जनावराच्या विषाचा वापर औषधं आणि इतर गोष्टींमध्ये केला जातो. म्हणूनच विषासाठी यांचं पालन देखील केलं जातं. 


( विशेष नोंद - वरील माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याच्या सत्य असत्यतेची zee24taas पुष्टी करत नाही )


scorpian poison business toxin sold for one crore US dollars