मॅड्रिड : जगभरात कोरोनासोबत आता मंकीपॉक्स तज्ज्ञांचं टेन्शन वाढवत आहे. याचं कारण म्हणजे 80 देशांमध्ये आता 21 हजारहून अधिक मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये भारतातही मंकीपॉक्सचे रुग्ण सापडले आहेत. अफ्रीकेमध्ये आतापर्यंत 75 लोकांचा या व्हायरसने मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ आता ब्रिटनमध्येही या व्हायरसचा दुसरा बळी गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्राझिलमध्ये मंकीपॉक्सचा एक बळी तर ब्रिटनमध्ये दोन बळी गेले आहेत. स्पेनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तिथे आतापर्यंत 4 हजारहून अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. यामध्ये 3500 पुरुषांचा समावेश आहे.  तर महिलांची संख्या 64 आहे. युरोपीय संघात 5300 लोकांना मंकीपॉक्स होऊ नये म्हणून लस देण्यात आली आहे. 


मंकीपॉक्सची लक्षणं काय? 
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार या आजारात ताप, पुरळ आणि अंगावर गाठीसारखे फोड उठतात किंवा रॅश येतात. या आजाराची लक्षणं साधारण 2 ते 4 आठवड्यांमध्ये दिसतात. काही रुग्णांमध्ये ही लक्षणं गंभीर दिसतात. यापैकी कोणतीही लक्षणं तुम्हाला आढळली तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या. 


हा व्हायरसचा धोका समलिंगी पुरुषांना असल्याचं दिसून आलं आहे. तज्ज्ञांनी समलिंगी पुरुषांना या व्हायरससंदर्भात सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे.