आतापर्यंतचा सर्वात खतरनाक Selfi, पण पुढे काय झालं... पाहा Video
सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्ध होण्यासाठी जीव धोक्यात
Trending News : सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्ध होण्यासाठी अनेक जीव धोक्यात घालतात. व्हिडिओ (Video) बनवून तो व्हायरल (Viral) करण्यासाठी आणि लाईक (Likes) मिळवण्यासाठी अशा काही गोष्टी करतात की ते पाहून धक्का बसल्याशिवाय रहात नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेल्फी घेण्यासाठी एका व्यक्तीने केलेलं कृत्य पाहून अंगाचा थरकाप उडेल.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
जंगल सफारीत (Jungle Safari) हिंस्त्र प्राणी (Wild Animals) आपल्याला अगदी जवळून पाहण्याची संधी मिळते. अनेकवेळा हे प्राणी आपल्या गाडीच्या अगदी जवळ येतात. अशाच एका प्रसंगाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत काही पर्यटक जंगल सफारी करताना दिसत आहे. त्याचवेळी त्यांच्या गाडीजवळ एक चिता (Cheetah) येतो. पण तो केवळ गाडीजवळच येत नाही, तर गाडीच्या टपावर जाऊन बसतो. चिता पाहून गाडीतल्या पर्यटकांची पाचावर धारण बसते. पण गाडीतला एक व्यक्ती मात्र भलतंच धाडस करताना व्हिडिओत दिसतो.
व्यक्तीचं भलतंच धाडस
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये चिता उडी मारून जीपच्या छतावर बसल्याचं दिसत आहे. यादरम्यान चित्ता कारच्या उघड्या छतावरून आत डोकावण्याचाही प्रयत्न करतो. यानंतर तो तिथेच बसतो. जीपमध्ये बसलेले सर्व पर्यटक भयंकर घाबरलेले दिसतायत, पण तितक्यात एक सफारी गाईड (Safari Guide) त्याच्या जागेवरून उठतो आणि चक्क चित्यासोबत सेल्फी (Selfie) घेऊ लागतो. चिताही शांतपणे बसलेला या व्हिडिओत दिसत आहे.
लोकांनी केल्या अशा प्रतिक्रिया
हा व्हिडिओ IFS अधिकारी क्लेमेंट बेन यांनी सोशल मीडियावर ट्विट केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 81 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. काही युजर्सने या व्यक्तीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. एका युजर्सने लिहिलंय, चक्क यमराजबरोबर सेल्फी. तर एक युजर्सने लिहिलंय सेल्फी घेणारा व्यक्ती जीवंत आहे का?