न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र संघाच्या इतर दक्षिण आशियाई क्षेत्र सहयोग संघटनेत  (SAARC) परराष्ट्र मंत्र्यांची बैठकी दरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या भाषणावर पाकिस्तानने बहिष्कार टाकला आहे. जयशंकर हे गुरुवारी बैठकीला संबोधित करत होते. पण पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यापासून दूर राहीले. भारतीय मंत्र्याचे भाषण संपताच पाकिस्तानी मंत्री बैठकीत पुन्हा सहभागी झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानतर्फे सार्क आणि दक्षिण आशियाच्या एकतेत बाधा आणल्याचा आरोप पाकिस्तानकडून भारतावर होत आहे. अशावेळी पाकिस्तानने भारताची बाजू ऐकून न घेता भाषणावर बहिष्कार टाकाला. 



भारत सरकारने ५ ऑगस्टला जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या संविधानाच्या अनुच्छेद ३७० रद्द केले. त्यानंतर पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय दुतांना हटविले. पाकिस्तान हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचा पूर्ण प्रयत्नात आहे. पण अनुच्छेद ३७० हटविणे हे आमचे अंतर्गत प्रकरण असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.