न्यूयॉर्क : क्रिस्टल बॉल या महिलेनं आपला आधीचा पती रिचर्डसह घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. तिने तशी जाहिरातच दिली आहे. ज्या व्यक्तीला तिचे घर विकत घ्यायचे असेल त्याला आपल्या एक्स पतीला त्याच्यासोबत ठेवावे लागेल अशी अट तिने घातली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिस्टल हिचा ७ वर्षांपूर्वी पती रिचर्ड याच्यासोबत घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगा आहे. परंतु, अजूनही क्रिस्टल आणि रिचर्ड व्यावसायिक भागीदार आहेत. ते दोघे भागीदार आहेत अशा बऱ्याच प्रॉपर्टी त्यांच्या नावावर आहेत.


त्या दोघांच्या प्रॉपर्टीपैकी क्रिस्टलला राहते घर विकायचे आहे. पण, यामुळे रिचर्डला बेघर व्हावे लागेल. यासाठी तिने घर विकण्यासाठी दिलेल्या जाहिरातीत जे पॅकेज दिले आहेत त्यात रिचर्डलाही समाविष्ट केलंय.


रिचर्ड आपल्या नवीन मालकासाठी जेवण बनवेल. घर स्वच्छ ठेवेल असे तिने जाहिरातीत म्हटलंय.  घर विकल्यानंतरही रिचर्डला राहायला जागा मिळावी, अशी इच्छा असल्याने तिने अशी जाहिरात दिल्याचं तिने सांगितलंय.


मात्र, घर विकणारे काही दलालांनी या जाहिरातीला विरोध केलाय. पतीसह घराच्या विक्रीला त्यांनी विरोध करत असं करणं कायद्याविरोधात असल्याचं ते म्हणताहेत. या विरोधामुळे क्रिस्टलने ती जाहिरात वेबसाइटवरून काढून टाकली आहे. पण, तिचं घर खूप चांगलं आहे. त्यामुळे कोणी तरी पतीसह हे घर विकत घेईल असा विश्वास तिला वाटत आहे.