Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर, बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर त्यांनी देशदेखील सोडला आहे. शेख हसीना या आता परदेशात स्थायिक होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची संपत्ती किती आहे परदेशात स्थायिक होण्यासाठी लागणारा पैसे त्यांच्याकडे कसा येणार, असा सवाल अनेकजण करत आहेत. शेख हसीना या पंतप्रधानपदी असताना त्यांना 3 लाख टका इतके वेतन मिळतत होते. मात्र, आता त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन काय? तर आज जाणून घेऊया शेख हसीना यांची एकूण संपत्ती किती आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेख हसीना यांना पंतप्रधान असताना 3 लाख टका इतके वेतन मिळत होते. भारताचे 100 रुपये हे 139.67 बांगलादेशी टकासमान आहेत. पब्लिक डोमेनने दिलेल्या माहितीनुसार, शेख हसीना यांच्या आर्थिक उत्पन्नांचा स्त्रोत सांगण्यात आला आहे. तसंच, निवडणुकांदरम्यानही शेख हसीना यांनी किती कमाई आहे याची माहिती निवडणुक आयोगाला दिली होती.


शेख हसीना यांची अनेक बिझनेसमध्ये पैसे गुंतवले आहेत. त्यातून त्यांना वर्षाला 12 लाखापर्यंतची कमाई मिळते. हसीना यांनी कपडे, दूरसंचार आणि बँकिंगसह अन्य क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. शेख हसीना यांची एकूण संपत्ती 50 कोटींच्या आसपास आहे. त्यांनी केलेल्या गुंतवणुकांचाही यात समावेश आहे. शेख हसीना यांच्याकडे अशा अनेक मालमत्ता आहेत ज्यातून त्यांना भाडे येते आणि ते वाढतही राहते. 


शेख हसीना यांनी कुठे केलीये गुंतवणूक?


शेख हसीना यांनी दूरसंचार क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. हे क्षेत्र योग्य परतावा आणि स्थिर विकास यासाठी ओळखलं जातं. येथूनही हसीना यांची कमाई होते. त्याव्यतिरिक्त, बँकिग क्षेत्रातही शेख हसीना यांनी गुंतवणूक केली आहे. शेख हसीना यांनी अनेक बँकांमध्ये गुंतवणूक केली आहे. तेथून त्यांना चांगला परतावा मिळतो. 


शेख हसीना यांच्याकडे किती सोनं?


बांग्लादेशमध्ये शेख हसीना यांच्याकडे शेती आणि जमीन आहे. निवडणुक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, 2022मध्ये त्यांना शेतीतून 78 लाखांचा फायदा झाला होता. तर, 2023मध्ये शेख हसीना यांना 50 कोटीपर्यंत संपत्ती असल्याची नोंद केली आहे. शेख हसीना यांच्याकडे 13 लाख रुपयांपर्यंतचे सोनं आहे. हसीना यांच्याकडे सिंगापूर आणि दुबईमध्येही काही संपत्ती आहे.