अवामी लीग पार्टीचे नेते धोक्यात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशमध्ये सध्या वातावरण फारच गंभीर आहे .शेख हसीना जरी देशातून बाहेर पडल्या असल्या ,तरी त्यांच्या अवामी लीग पार्टीचे नेते बांगलादेशमधेच आहेत . बांगलादेशची जनता फार संतप्त असून अवामी लीग पार्टीचे नेते सुरक्षित आहेत का नाही ?असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना घडत आहेत.


भारत-बांगलादेशच्या सीमेजवळ मृतदेह सापडला 
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनायांच्या अवामी लीग पार्टीचे नेते इशाक अली खान पन्ना यांचा, कूजलेला मृतदेह मेघालय पोलिसांना बांगलादेशच्या हद्दीला लागून असलेल्या जैंतिया टेकडीवरील सुपारीच्या बागेत मिळाला आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, मृतदेह 26 ऑगस्टच्या संध्याकाळी भारत-बांगलादेशच्या सीमेपासून सूमारे 1.5 कि.मी.अंतरावर सापडला.


पासपोर्ट वरुन ओळखलं
इशाक अली खान पन्नांची ओळख त्यांच्या पासपोर्ट वरुन झाली . पुढील तपासणी आणि ओळख चाचणीसाठी मृतदेह ख्लेरियत येथील जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे ,असे एस.पी.गिरी प्रसाद  यांनी सांगितले. आधीच्या अहवालानुसार पन्नांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला असू शकतो असे कळले. मात्र एस.पी.गिरी प्रसाद म्हणाले, "कदाचित पन्नाबांगलादेशच्या सीमा रक्षकांच्या गोळीबाराचा शिकार झाले असतील."


सरकार पडल्यापासूनच फरार होते
इशाक अली खान पन्ना हे बांगलादेशी व्यापारी आणि बांगलादेश छात्रो लीगचे सरचिटणीस होते. ते अवामी लीग पार्टीचे प्रसिद्ध नेते होते.शेख हसीनांचे सरकार पडल्यापासून पन्ना फरार होते. पी.टी.आय ने सांगितले की 5 ऑगस्टपासूनचं पन्नां गायब झाले होते.