बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडसाठी बनवले असे नियम, जे ऐकल्यावर तुम्हालाही बसेल धक्का...
एक घटना समोर आली आहे जी ऐकून तुम्हाला तुमचा राग आवरणार नाही.
मुंबई : सध्याच्या युगात कॉलेज किंवा विद्यापिठात जाणाऱ्या तरुण-तरुणीचे प्रेमसंबंध असल्याचे आपल्याला पाहायला मिळताता. जे आता कॉमन झालं आहे. आपल्या रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आपल्याला या जोडप्यातील वाद देखील पाहायला मिळतात. हे वाद वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकतात. तसे वाद हे कोणामध्ये होत नाही. भावा बहिणीपासून ते नवरा-बायकोपर्यंत सगळेच भांडतात. या अशा भांडणांमुळे नात्यातील प्रेम देखील वाढतं, परंतु हद्द तेव्हा पार होते, जेव्हा कोणतीही व्यक्ती गरजेपेक्षा जास्त दुसऱ्या व्यक्तीवरती हक्क सांगू लागतो.
अशीच एक घटना समोर आली आहे जी ऐकून तुम्हाला तुमचा राग आवरणार नाही. कारण एका मुलीच्या बॉयफ्रेंडने तिच्यासाठी असे नियम बनवले, जे ऐकून कोणालाही चक्कर येऊ शकते किंवा त्यांचा संताप होईल.
कारण या बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडचे खाणे, पिणे, प्रवास करणे आणि विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करणे यावर निर्बंध लादले आहेत. मुलीने सोशल मीडियावर या नियमांचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, जो अल्पावधीत 27 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
मुलीने तिच्या एक्स-बॉयफ्रेंडची बॅन (Ban List) यादी शेअर केली आहे, ज्यात असे म्हटले आहे की, ती दारूला स्पर्शही करणार नाही. स्नॅपचॅट लोकेशन बंद करणार नाही, मुलांसोबत हँग आउट करणार नाही, बॉयफ्रेंडने दिलेली अंगठी कधीही काढणार नाही. दररोज रात्री 9 वाजेपर्यंत वसतिगृहात परत येईल. क्रॉप टॉप आणि घट्ट ड्रेस घालणार नाही आणि त्याला स्वत:ला म्हणजेच बॉयफ्रेडंला पार्टीला उपस्थित राहण्यास मनाई करणार नाही.
लोकांनी सांगितले, हे नियम अपमानजनक
या नियमांची यादी सोशल मीडियावर शेअर करताना ती मुलगी म्हणाली, "मला फक्त एवढेच सांगायचे आहे की, असे वर्तन अत्यंत अपमानजनक आहे. हे एखाद्याला भावनिकरित्या खाली दाबून ठेवण्यासारखे आहे. जेव्हा तुमच्यासोबत ही असे काही घडत असेल किंवा घरगुती हिंसा होत असेल तेव्हा इतरांची मदत घ्यावी.
लोकांनी मुलीच्या एक्स-बॉयफ्रेंडच्या वागणूकीचा निषेध केला आहे आणि या मुलीसाठी सहानुभूती व्यक्त केली. ही यादी पाहून एका यूजरमे म्हटले, 'हे खूप भीतीदायक आहे.' त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले, 'मला आनंद आहे की, तुम्ही यातून बाहेर आलात.'