अवकाशात चंद्रानं सोडली पृथ्वीची साथ; आता तो पुन्हा कधीच परतणार नाही?
Space Earth Moon : अवकाशातील घडामोडींवर पृथ्वीवरून विविध देशांतील अवकाश संशोधन संस्था लक्ष ठेवून असतानाच एक मोठी घटना घडल्याचं वृत्त समोर आलं...
Space Earth Moon : चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून त्याचा पृथ्वीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होताना दिसतो. पण, याच चंद्रानं पृथ्वीची साथ सोडली तर? किंबहुना प्रत्यक्षात असं घडलंय. पण, हा आहे पृथ्वीचा दुसरा चंद्र. तुम्हाला माहितीये का पृथ्वीला आणखी एक चंद्रसुद्धा असून या चंद्राला 2024 PTS अशी ओळख आहे. साधारण दोन महिने या दुसरा चंद्र पृथ्वीचा पाहुणा होतं असं म्हणायला हरकत नाही.
आता मात्र हा चंद्र पृथ्वीची साथ सोडून अवकाशाच्या सफरीवर गेला आहे. लघुग्रहाच्या एका वेगळ्या क्षेत्राच्या म्हणजे अॅस्टरॉईड बेल्टच्या दिशेनं हा चंद्र गेल्याचं सांगितलं जात आहे. हा अॅस्टरॉईड बेल्ट पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान असून त्याचा आकार साधारण एखाद्या बससारखा आहे.
सूर्यापासून 15 कोटी किमी अंतपावर असणाऱ्या या बेल्टची दिशा वेगळी असल्याची माहिती मद्रिद विद्यापीठाचे प्राध्यापक कार्लोस डेला फ्यूएंटे मार्को यांनी दिली. या बेल्टमध्ये असणारे दगड हे सहसा पृथ्वीपासून जवळ असणाऱ्या गोष्टींमध्ये अर्थात Near Earth Objects म्हणून ओळखले जातात. त्यापैकी काही शिळा पृथ्वीच्या अतिशय जवळूनही जातात. तेव्हा त्यांचं अंतर जवळपास 45 लाख किमी इतकं असतं. या शिळांचा वेग प्रतितास 3540 किमी इतका असतो. अशीच एक शिळा म्हणजे पृथ्वीचा हा दुसरा चंद्र.
कधी परतणार हा दुसरा चंद्र?
खगोलशास्त्रज्ञांच्या माहितीनुसार पृथ्वीचा हा दुसरा चंद्र पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा पृथ्वीच्या जवळून जाईल. त्यावेळी पृथ्वीच्या पृष्ठापासून त्याचं अंतर 17.8 लाख किमी इतकं असेल. सध्याच्या घडीला या शिळेच्या संपूर्ण प्रवासावर कॅलिफोर्नियातील मोजावे वाळवंटात असणारा गोल्डस्टोन सोलर सिस्टीम रडार लक्ष ठेवून आहे. त्याशिवाय नासाचा डीप स्पेस नेटवर्कही त्यावर नजर ठेवत असल्याचं लक्षात येत आहे.
मिनी मून म्हणजे नेमकं काय?
मिनी मून दोन पद्धतींनी पृथ्वीच्या जवळून पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यापैकी एक शक्यता म्हणजे एखादी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात अडकली तर ती दोन वर्षांपर्यंत बाहेर पडू शकत नाही. ज्यामुळं ही वस्तू चारही बाजूंनी पृथ्वीभोवती फेऱ्या मारताना दिसते. आणखी एक प्रकार म्हणजे एखादी लहानशी शिळा काही दिवस किंवा काही महिन्यांच्या कालावधीसाठीच पृथ्वीच्या कक्षेत असते.
हेसुद्धा वाचा : मुलं नाही, तर मग कोण? , वॉरन बफे यांनी ठरवला 147.4 अब्ज डॉलरच्या संपत्तीचा वारसदार
यापूर्वीसुद्धा दोनदा दोन मिनी मून पृथ्वीच्या कक्षेमध्ये घिरट्या घालत असल्याचं पाहायला मिळालं. त्यापेकी पहिला मिनी मून 2006 RH120 आणि दुसरा मिनी मून 2020 CD3 या नावानं ओळखला जातो. याव्यतिरिक्त अॅस्टेरॉईड बेल्टमधून तीन लहान शिळाही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात अडकून लघु काळासाठी प्रवास करताना दिसल्या. 1991 VG, 2022 NX1 आणि आता फसलेला 2024 PTS ही त्याचीच उदाहरणं.
सर्वसामान्य दूर्बिणीनं अवकाशातील या हालचाली पाहता येत नाहीत. या सर्व लहानमोठ्या घडामोडी पाहण्यासाठी 30 इंचांचा व्यास असणाऱ्या सीसीडी किंवा सीएमओएस डिटेक्टर टेलिस्कोपची आवश्यकता असते.