आपल्या बाळासाठी आईनं कापला स्वत:चाच पाय...पण का? नक्की असं काय घडलं जाणून घ्या
आपल्या मुलाला सुरक्षितपणे जन्म देण्यासाठी आपल्या आयुष्याशी मोठी तडजोड केली आहे.
ओसबोर्न : आई ही आई असते ती आपल्यामुलासाठी काहीही करु शकते आणि ते वेगळं सांगण्याची आता गरज नाही. आईने तिच्या कृत्यातून हे नेहमी दाखवून दिलं आहे की, ती तिच्या बाळावर आपल्या जिवापाड प्रेम करते. अशाच एका आई आपल्या मुलावर कोणत्या थराला जाऊन प्रेम करु शकते याचं एक उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे.
या आईने आपल्या मुलाला सुरक्षितपणे जन्म देण्यासाठी आपल्या आयुष्याशी मोठी तडजोड केली आहे. तिच्या न जन्मलेल्या मुलासाठी, तिचा संपूर्ण पाय कापला आहे. ज्यामुळे या आईच्या धाडसाचं कौतुक लोकही करत आहेत आणि संपूर्ण प्रकरण तुम्हाला माहित झाल्यावर तुम्ही खूप भावनीक व्हाल.
आईला कॅन्सर होता
28 वर्षीय कॅथलीन ओसबोर्न, यूकेच्या विस्बेकमध्ये राहते, तिला गरोदरपणात कळले की, तिच्या पायात गाठ आहे. डॉक्टरांनी सांगितले की, ही कॅन्सरची गाठ आहे. जर कॅथलीनला हवे असेल, तर ती तिच्या पोटातील मुलाला जन्म न देता म्हणजेच अबॉर्शन करुन, केमो थेरपी घेऊ शकते, अन्यथा तिला तिचा पाय कापावा लागेल.
परंतु आपल्या पोटच्या मुलाला न गमावता आईने तिच्या न जन्मलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आपला पाय कापून टाकणे पसंत केले.
या निर्णयानंतर, तिचा पाय गर्भधारणेच्या चौथ्या महिन्यात कापला गेला आणि मार्चमध्ये तिने प्रीमॅच्योर बेबी एडा-मे ला जन्म दिला.
पाय कापल्यानंतरही कॅथलीन आनंदी
कॅथलीनला यापूर्वी दोनदा कॅन्सर झाला होता. त्याच वेळी, एक गाठ झाल्यानंतर, तिला तिच्या बाळासाठी पाय कापावा लागला परंतु तरीही ती खूप आनंदी आयुष्य जगत आहे. द सनच्या वृत्तानुसार कॅथलीन म्हणते, 'मी माझ्या निर्णयावर खूश आहे. मला माझ्या 2 मोठ्या मुलांसाठी एक बहीण हवी होती.
माझ्याकडे आता फक्त काही महिने किंवा वर्षे शिल्लक आहेत. या काळात, मला माझ्या मुलांसोबत वेळ घालवून छान आठवणी बनवायच्या आहेत. मुलंच आता माझ्या आयुष्यातील सर्व काही आहे, मला माझ्या स्वप्नांची पर्वा नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे, मला माझ्या मुलांसोबत आनंदाने जगायचे आहे.