काबुल : तालिबान्यांनी अफगानिस्तान आपल्या ताब्यात घेतल्यानंतर तेथील लोकांमध्ये आधीच भितीचे वातावरण निर्माण झाले होते, ज्यामुळे अनेक लोकांनी देश सोडण्याचा देखील प्रयत्न केला. काही लोकं यामध्ये यशस्वी ठरले, तर उरलेल्या लोकांना मात्र तेथेच राहावे लागले. अफगानिस्तानात लोकं उद्या काय घडेल या भितीने आजचा दिवस ढकलत आहेत. अशातच आता आणखी एका धक्कादायक बातमीने जोर धरला आहे, ज्यामुळे देशील लोकं आता आणखी घाबरले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तालिबान अतिरेक्यांनी अफगान राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघाच्या कनिष्ठ महिला सदस्याचा शिरच्छेद केला, याची माहिती एका प्रशिक्षकाने पर्शियन इंडिपेंडंटला दिली. एका मुलाखतीत प्रशिक्षक अफजल कुरेशी (नाव बदलले आहे) म्हणाली की, महजबीन हकीमी नावाच्या महिला खेळाडूला ऑक्टोबरच्या सुरुवातीला तालिबानने ठार केले होते, परंतु या भीषण हत्येबद्दल कोणालाही कळले नाही कारण बंडखोरांनी तिच्या कुटुंबाला याबद्दल कोणाला काहीही न सांगण्याची धमकी दिली होती.


महजबीन ही काबुल नगरपालिका व्हॉलीबॉल क्लबकडून खेळली आहे  (Kabul Municipality Volleyball Club). तसेच ती क्लबमधील स्टार खेळाडूंपैकी एक होती. त्यानंतर जेव्हा तालिबान्यांनी अफगाणिस्तान जेव्हा आपल्या ताब्यत घेतला तेव्ही तिचं डोकं तिच्या शरीरापासून वेगळं करण्यात आलं, यानंतर काहि दिवसांपूर्वी तिची रक्ताळलेली मान आणि धडापासून वेगळं झालेलं शिर याचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाला.


अफगाण महिला राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणाले की, ऑगस्टमध्ये तालिबान्यांनी पूर्ण नियंत्रण मिळवण्याआधीच संघातील दोनच खेळाडू देशातून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. महजबीन हकीमी मात्र इतर खेळाडूंसोबत मागी राहिली.


तोलिबान्यांच्या ताब्यात अफगाण आल्यानंतर त्यांनी महिला खेळाडूंची ओळख करून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला; ज्यांनी परदेशी आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि भूतकाळात माध्यमांच्या कार्यक्रमात दिसला होता, अशा अफगाणी महिला व्हॉलीबॉल संघाच्या सदस्यांच्या शोधात अतिरेकी अधिक उत्सुक होते, असा प्रशिक्षकांनी दावा केला.


अफगाणिस्तान राष्ट्रीय महिला व्हॉलीबॉल संघाची स्थापना 1978 मध्ये झाली होती आणि ती देशातील तरुण मुलींसाठी आशेचा एक किरण ठरलं. मात्र, आत महजबीनच्या मृत्यूने आता सगळ्याच महिला खेळाडूंमध्ये आणि देशात देखीस भितीचं वातावरण तयार झालं आहे.


अफगाणिस्तान सोडण्यासाठी परदेशी संस्था आणि देशांचा पाठिंबा मिळवण्यासाठी टीमच्या सदस्यांनी केलेले प्रयत्न आतापर्यंत अपयशी ठरले आहेत.


गेल्या आठवड्यात फिफा आणि कतार सरकारने राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या सदस्यांसह 100 महिला फुटबॉलपटू आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अफगाणिस्तानातून यशस्वीरित्या बाहेर काढले.


तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर क्रीडा, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात महिलांच्या सर्व समावेश थांबवला गेला आहे. अफगाणिस्तानातील बहुसंख्य मुलींना माध्यमिक शाळेत जाण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.