मुंबई : प्रेत्येक लोकांना आपण जास्त पैसा कमवावा असे वाटत असते. बऱ्याच लोकांना तर असे देखील वाटत असते की, जर माझ्या बँकेत अचानक पैसे आले तर? पण आपण या गोष्टीचा विचार फक्त स्वप्नातच करु शकतो. ही गोष्ट तशी खरी होणार नाही हे पण तेवढच खरं. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ही गोष्ट एका व्यक्तीसोबत खरीखुरी घडली आहे. या व्यक्तीच्या खात्यात बँकेने शे-दोनशे नाही, हजार नाही तर चक्क करोडो रुपये पाठवले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा प्रकार ब्रिटनमध्ये घडला आहे. वास्तविक, यूकेच्या Santander बँकेने चुकून बँकेच्याच 2 हजार खात्यांमधील पैसे 75 हजार लोकांच्या अकाऊंटमध्ये गेली. एकूण 130 दशलक्ष पौंड म्हणजेच सुमारे 1300 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. आता बँक हे पैसे परत मागत आहे, पण लोक ते परत करायला तयार नाहीत.


25 डिसेंबर रोजी Santander बँकेकडून हा घोळ झाला होता. विशेष बाब म्हणजे Santander बँकेचे हे पैसे Barclays, HSBC, NatWest, Co-operative Bank आणि Virgin Money या प्रतिस्पर्धी बँकांच्या ग्राहकांच्या खात्यात गेले. डेली मेलच्या वृत्तानुसार, हे पैसे बँकेत परत जाणार नाहीत, अशी भीती सॅनटेंडर बँकेलाही आहे.


मात्र, बँकेकडे पैसे परत मिळवण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे बँक जबरदस्तीने ग्राहकांना पैसे परत पाठवण्यास सांगेल. त्याच वेळी, बँकेकडे दुसरा पर्याय म्हणजे त्या ग्राहकांकडे जाऊन रक्कम परत मिळवणे.


खरेतर बँकेकडून एक स्टेटमेंटही आले आहे, ज्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे म्हटले आहे.


यूकेच्या कायद्यानुसार, ग्राहकाच्या खात्यात चुकून पैसे जमा झालेले तर ते पैसे परत घेऊ शकतात. जर ग्राहकांनी पैसे परत केले नाहीत, तर त्यांना जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. या बँकेचे यूकेमध्ये सुमारे 14 दशलक्ष ग्राहक आणि 616 शाखा आहेत. सॅंटेंडर यूके ही ग्लोबल बँक बँको सँटेन्डरची सहयोगी बँक आहे.


याआधी अमेरिकेच्या सिटी बँकेने देखील कॉस्मेटिक कंपनी रेव्हलॉनच्या कर्जदारांना चुकून $900 दशलक्ष दिले होते. बँक यातून $500 दशलक्ष वसूल करू शकली नाही. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी न्यायालयाशी संपर्क साधला होता, परंतु फेब्रुवारीमध्ये अमेरिकेच्या न्यायालयाने सांगितले की बँकेला ते वसूल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.