बीजिंग : इंटरनेटचे जग इतके विचित्र आहे, की येथे तुमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे देखील गोष्टी घडतात. तुम्ही जर निट आणि प्रॅक्टीकल विचार केलात तर जे लोक सोशल मीडियावर तुमचे मित्र आहेत त्यांना तुमची काळजी नाही, तुम्ही आयुष्यात काय करता तुमच्या आयुष्यात कोणतंही संकट आलं तरी हे लोकं काही तुम्हाला मदत करायला किंवा सांत्वन करायला येत नाहीत. त्यांना कदाचित तुमच्या मृत्यूचीही पर्वा नसते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही हे असे म्हणत आहोत कारण सोशल मीडियावरती एका 25 वर्षीय सोशल मीडिया स्टार तिच्या फॉलोअर्सच्या सांगण्यावरुन लाईव्हदरम्यान कीटकनाशक प्यायली ज्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.


डेली स्टारच्या अहवालानुसार, लुओ शियाओ माओ माओ झी या चिनी सोशल मीडिया स्टारचा वेदनादायक मृत्यू लाईव्ह चॅटदरम्यान कीटकनाशक प्यायल्यामुळे झाला. 14 ऑक्टोबर रोजी लुओमध्ये ही घटना घडली. द पेपर या चिनी आउटलेटनुसार, घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी लुओचा मृत्यू झाला. लुओ शियाओ माओ माओ झी (Luo Xiao Mao Mao Zi) ही  डुओयिन (Douyin) नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टार होती.



लोकांनी विष पिण्यास भडकवले


व्हिडीओच्या शेवटच्याकडे येताना, लुओने स्वतः सांगितले की, हा कदाचित तिचा शेवटचा व्हिडीओ आहे, कारण ती बऱ्याच काळापासून दीर्घ नैराश्यातून जात आहे. ती 2 महिने आधी रुग्णालयातही होती. लुओने व्हिडीओमध्ये असेही म्हटले आहे की, ती कोणत्याही उत्पादनाची विक्री करण्यासाठी हा व्हिडीओ बनवत नाही. तिने हातात कीटकनाशकाची बाटली घेतली होती आणि त्या वेळी लाईव्ह स्ट्रीम करत होती.


तिचे इंटरनेटवर लाखो फॉलोअर्स होते, ज्यांच्यासाठी ती जवळजवळ दररोज विविध प्रकारचे कंटेन्ट टाकत होती.


लुओला प्रियकराची काळजी होतीलुओच्या जवळच्या मित्राच्या मते, ती तिच्या प्रियकरामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून अस्वस्थ होती. त्या दिवशी कीटकनाशक पिऊन मरण्याचा तिचा हेतू नव्हता, परंतु तिला फक्त तिच्या प्रियकराचे लक्ष वेधायचे होते. विष सेवन केल्यानंतर तिने स्वतः रुग्णवाहिका बोलावली होती, पण तोपर्यंत औषधाने त्याचा परिणाम दाखवला होता. जेव्हा तिने स्वत: ला मारण्यासाठी कीटकनाशक प्याले, तेव्हा हजारो लोक तिला थेट लाईव्ह पाहत होते.


डुओइनवर लुओचे 6 लाख 70 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते, परंतु त्यावेळी कोणीही त्याला हे धोकादायक पाऊल उचलण्यापासून रोखले नाही. याआधीही, जगाच्या विविध भागांमध्ये सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्यांच्या लाइव्ह चॅटमध्ये आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत.