सांता क्रूज : आपल्या आवडीचे फूड खायला जाणं एका माहिलेला महागात पडलं आहे. तिच्या सोबत जे घेडलं त्यानंतर आता स्वपनात सुद्धा त्यापदार्थांचा विचार करणार नाही. खरेतर एक महिला फास्ट-फूड स्टोअरमध्ये हॅम्बर्गर खाताना त्यात तिला कुजलेल्या मानवी बोटाचा भाग सापडला, त्यानंतर ती खूप घाबरली. या महिलेचं नाव स्टेफनी बेनिटेझ आहे. गेल्या रविवारी दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया देशामधील सांता क्रूज डे ला सिएरा शहर (Santa Cruz de la Sierra City) मध्ये हॉट बर्गर स्टोअरमधून बर्गरची ऑर्डर दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेफनी बेनिटेझने सांगितले की, हॅम्बर्गर ऑर्डर आल्यानंतर, तिने जसा त्याचा पहिला चावा घेतला, त्याबरोबर तिच्या तोंडात काहीतरं आलं, ज्याला निट पाहिल्यावर या महिलेच्या लक्षात आलं की, हे एक मानवी बोट आहे.


फेसबुकवर पोस्टकरत स्टेफनी म्हणाली, "डिनरच्या वेळी एक मानवी बोट माझ्या तोंडात आले, ज्याला मी तोंडात चघळले सुद्धा." पोस्टमध्ये स्टेफनीने सडलेल्या बोटाचा फोटो आणि हॉट बर्गर कंपनीच्या प्रतिनिधीशी बोलण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. स्टेफनीला एका प्रतिनिधीशी बोलण्यासाठी बराच काळ तेथे थांबावे लागले.


फास्ट-फूड स्टोअरकडून वक्तव्य


व्हिडीओमध्ये, हॉट बर्गरच्या प्रतिनिधीला असे म्हणताना ऐकले जाऊ शकते, "कृपया तुम्हाला काय हवे आहे, ते सांगा आम्ही ते तुम्हाला देऊ." त्यांनी असा दावा केला की बर्गर आधीच तयार होऊन स्टोअरमध्ये पोहोचते आणि आमच्याकडे आधी असे कधीच घडले नाही. नंतर प्रतिनिधीने स्टेफनी बेनिटेझची माफी मागितली. स्टेफनीची ही स्टोरी ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर कंपनीच्या प्रवक्त्याने या प्रकरणाला "दुर्दैवी घटना" म्हटले.


पोलिसांनी दुकान बंद करून दंड ठोठावला


नॅशनल पोलिसांच्या स्पेशल क्राईम फाइटिंग फोर्सचे संचालक एडसन क्लेअर यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, कंपनीच्या कर्मचाऱ्याने कामावर असताना यापूर्वी त्याच्या तर्जनीचा छोटा भाग गमावला होता. तो कदाचित त्याच्याच हाताचं बोटं असावं, त्याचा पुढील तपास ते करतील.


पोलिसांनी फास्ट-फूड स्टोअर तात्पुरते बंद केले आहे आणि त्यावर दंड आकारला आहे. मात्र, त्यानंतर स्टेफनी तिच्यावतीने काही कायदेशीर कारवाई करेल की नाही हे अद्याप ठरलेलं नाही.