मुंबई : अनेकांना सापांबद्दल (Snakes) जाणून घ्यायला खूप आवडतं. तुम्हीही सोशल मीडियावर सापांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा पाहिले असतील. मात्र यातील बरेच व्हिडिओ हे सापाच्या बचावाचे किंवा सापाच्या हल्ल्याचे असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सापाची कात (Snake Skin) काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साप आपली कात बदलतो हे आपल्या सगळ्यांना माहित आहेच. पण तुम्हाला माहित आहे का की साप वर्षातून 3-4 वेळा त्यांची कातडी बदलतात. असा एक व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य होईल. या एक व्यक्ती सापाची कात काढताना दिसत आहे. हळुहळू तो माणूस हाताने सापाची कात काढतोय. काही क्षणातच ती व्यक्ती सापाची कात पूर्ण काढते आणि सापाची नवीन त्वचा ही दिसू लागते. खरंतर सापाची कात काढल्यानंतर स्वच्छ आणि चमकदार दिसते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झाला आहे. सापासोबत असं काही करण्याचं धाडस हे फक्त सर्पमित्रांना जमतं. त्यांना असलेला हा अनुभन खूप गरजेचा आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ Snake_World या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. 5 लाख पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर 7 हजार पेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओला लाइक केलं आहे.