मुलतान : पाकिस्तानातील एका रूग्णालयात धक्कादायक घडना समोर आलीये. मुलतान इथल्या रुग्णालयाच्या छतावर मृतदेहांचा ढीग पडला असल्याचं समोर आलं आहे. हे प्रकरण पंजाबच्या निश्तर रूग्णालयाचं आहे. याठिकाणी मृतदेहांचे अनेक भागही गायब असल्याचं दिसून आलंय. याठिकाणी मृतदेहांचे तुकडे करण्यात आले असून अनेक मृतदेहांच्या छाती ओपन केल्या गेल्या असल्याचं समोर आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संपूर्ण घटनेवरून या सर्व मृतदेहांमधून अवयव काढण्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. रुग्णालयाच्या छतावरून सापडलेल्या मृतदेहांची संख्या जवळपास 500 पर्यंत असल्याचं म्हटलं गेलंय.


दरम्यान या घटनेबाबत अजून पुरेशी माहिती मिळालेली नाही. हे मृतदेह कोणाचे आहेत याशिवाय रुग्णालयाच्या छतावर एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह आले कसे हा प्रश्न अजून अनुत्तरीत आहे. या मृतदेहांमधून अवयव काढून त्यांची तस्करी केली जात असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.



रुग्णालयाच्या छतावर सापडलेल्या या मृतदेहांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हायरल झालेला व्हिडीओ मन अवस्थ करणार आहे. 


परवेझ इक्बाल नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की, पंजाब प्रांतातील निश्तर हॉस्पिटलच्या छतावरून 500 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. अनेक मृतदेहांच्या छाती ओपन असून यांच्या कपड्यांवरून ते बलूच समुदायाचे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.