Israeli diplomat attack in China : इस्रायल हमास युद्धाचा (Israel Hamas War) आज सातवा दिवस आहे. युद्धात आतापर्यंत जवळपास 4 हजारपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय. इस्रायलनं गाझा पट्टीवर गेल्या 6 दिवसांमध्ये 6 हजाराहून अधिक बॉम्बहल्ले केलेत. म्हणजेच प्रत्येक दिवशी एक हजार बॉम्ब हल्ल्याचा मारा करण्यात आलाय. त्यामुळे आता दोन्ही देशांमधील युद्ध टोकाला गेल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता इस्त्रायली नागरिकांवर इतर देशात देखील हल्ले होत असल्याचं समोर येत आहे. असातच एक प्रकार चीनची राजधानी बिजिंगमध्ये घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनची राजधानी बिजिंगमध्ये इस्त्रायली राजदुतावर हल्ला (Israel diplomat stabbed in china) झाल्याचं समोर आलं आहे. दुपारच्या वेळेत जेव्हा राजदुत कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. चाकूने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर हल्लेखोराने तिथून धूम ठोकली. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


पाहा Video



दरम्यान, इस्रालयने पॅलेस्टिनी नागरिकांसाठी अल्टिमेटम दिलाय.. पुढच्या 24 तासांमध्ये उत्तर गाझा पट्टी खाली करा नाहीतर भीषण हल्ला करु असा इशारा इस्रायलने दिलाय.. इस्रायलने याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघालाही दिली आहे.. उत्तर गाझा पट्टीमध्ये तब्बल 11 लाख पॅलेस्टिनी नागरिक राहतात... या नागरिकांनी दक्षिण गाझा पट्टीत स्थलांतरित व्हावं असा इशारा इस्रायलने दिलाय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर महाभियोग खटला चालवा, असा सल्ला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय. हमासचा हल्ला हा नेतन्याहू यांचं मोठं अपयश असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. त्यामुळे नेतन्याहू यांना पदावरून हटवा, अशी मागणी ट्रम्प यांनी केलीय.