धक्कादायक! `ती` गरोदर राहिली आणि तिसऱ्या दिवशी बाळाला जन्मही दिला; कसं शक्यंय?
किडनी आणि यकृत व्यवस्थित काम करत नव्हतं. तिचा रक्तदाबही वाढला होता. ज्यामुळं डॉक्टरांनी ताबडतोब बाळाला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. अखेर C Section च्या माध्यमातून तिची प्रसूती करण्यात आली.
Viral News : एखाद्या महिलेच्या पोटात गर्भ वाढतोय आणि त्याची तिला कप्लनाच नाही, असं कधी झालेलं पाहिलंय का? शरीरात होणारा प्रत्येक बदल आपल्याला काहीतरी सूचित करत असतो. हा तर एक गर्भ आहे. पण, आता हे उदाहरणही अपवाद ठरत आहे. कारण, एक अशी घटना घडलीये जिथे महिलेला ती गरोदर असल्याचं समजल्यानंतर अवघ्या 48 तासांतच तिनं बाळाला जन्म दिला आहे. बसला ना धक्का? (shocking Viral News women gave birth to child within 48 hours of knowing about pregnancy)
अमेरिकेतील (America) नेब्रास्कामध्ये ही घटना घडली. शिक्षिका असणाऱ्या 23 वर्षीय पेटन स्टोवरला गरोदरपणाची (Pregnancy) कोणतीच लक्षणं शरीरात आढळून आली नाहीत. थकवा जामवत होता, पण तोसुद्धा कामाच्या ताणामुळं असावा असं तिला वाटत होतं.
डॉक्टरांकडे गेली आणि...
पाय सुजू लागल्यानंतर ती डॉक्टरांकडे गेली आणि तिथे हादरवणारी माहिती समोर आली. प्रियकर ट्रॅविस कोएस्टरसोबतच्या नात्यातून ती गरोदर असल्याचं त्याचवेळी कळलं. प्रेग्नेंसी टेस्ट केल्यानंतर ती गरोदर असल्याचं स्पष्ट झालं. पण, खात्री करुन घेण्यासाठी म्हणून तिची सोनोग्राफीही (Sonography) करण्यात आली. जेव्हा कुठे पोटात गर्भ वाढत असल्याच्या माहितीवर तिचा विश्वास बसला.
अधिक वाचा : Trending Video: देव तारी त्याला कोण मारी! रेल्वे ट्रॅक ओलांडताना अचानक आली ट्रेन अन्...
पेटन गरोदर असल्याचं कळताच काही महत्त्वाच्या चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांनी धावपळ सुरु केली. कारण पेटनची किडनी आणि यकृत व्यवस्थित काम करत नव्हतं. तिचा रक्तदाबही वाढला होता. ज्यामुळं डॉक्टरांनी ताबडतोब बाळाला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. अखेर C Section च्या माध्यमातून तिची प्रसूती करण्यात आली.
पेटननं अवघ्या 1 किलो 800 ग्राम वजनाच्या मुलाला जन्म दिला. 10 आठवडे आधीच जन्म झाल्यामुळे त्याचं वजन इतकं कमी होतं. डॉक्टरांच्या माहितीनुसार पेटन प्री-एक्लेमप्सिया पीडित होती. ज्यामध्ये गरोदरपणादरम्यान रक्तदाब वाढू शकतो. पेटन आणि तिचा प्रियकर या दोघांनीही मुलाची स्वप्न पाहिली होती, पण अनपेक्षितपणे त्यांचं हे स्वप्न वेळेआधीच पूर्ण झालं ज्यावर त्यांचाही विश्वास बसला नाही.