काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबान बंडखोरांच्या प्रवेशानंतर हजारो लोकांती गर्दी काबूल विमानतळावर दिसत आहेत. अनेक देशांमधील राजकारणी व्यक्तींना काबूल विमानतळावरून सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे. एवढंच नाही तर विमानतळावर गोळीबार झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे विमानतळावर लोकांची पळापळ सुरू होती. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काबूलमधील अमेरिकन दूतावासाजवळ दोन मोठे स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात कोणी जखमी किंवा ठार झाले की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. अमेरिकेने आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी लपण्यास सांगितले आहे. यासह, काबूल विमानतळावर गोळीबारही झाला आहे, ज्यामुळे काबूल विमानतळावर आग लागली.


काबूलहून व्यावसायिक उड्डाणांवर बंदी
काबूलमधील 11 जिल्ह्यांवर वर्चस्व प्रस्थिपित केल्यानंतर तालिबानने सर्व व्यवसायिक उड्डाणांवर बंदी आणली आहे. त्याचबरोबर विमानतळावर उपस्थित असलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लष्कराची विमाने मदतीसाठी पोहोचले आहेत. अमेरिकेच्या एका लष्करी अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.