मुंबई  : काही महिन्यांपूर्वी भारतीय सुरक्षा दलातील जवानांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारताकडून पाकिस्तानातील बालाकोट येथे असणाऱ्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले. या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांमध्ये असणारे संबंध आणखीन चिघळले. याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर झाला. त्यातीलच एक म्हणजे हवाई वाहतूक. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालाकोट हल्ल्यानंतर तब्बल १३९ दिवसांनी पाकिस्तानकडून त्यांचं हवाई तळ सर्व प्रकारच्या उड्डाणांलाठी पुन्हा सुरु करण्यात आलं आहे. भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानातील हवाई तळ बंद करण्यात आलं होतं. परिणामी, एअर स्पेस बंद असल्यामुळे युरोप आणि आखाती राष्ट्रांकडे जाणाऱी सारी उड्डाणं गुजातवरुन अरबी समुद्र ओलांडून  जात होती. पण, सध्याच्या घडीला पाकिस्तान सिव्हील एव्हिएशन ऑथॉरिटीकडून लावण्यात आलेले हे निर्बंध तातडीने हटवण्यात आले आहेत. 


हवाई वाहतुकीवरील या निर्बंधामुळे एअर इंडियालाही जवळपास, ४९१ कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. इंटरनॅशनल सिव्हील एव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार या परिस्थितीत दररोज १३३ विमानांतील जवळपास ७० हजार प्रवासी प्रभावित होत होते. 


दरम्यान, भारतीय हवाई तळांवरुन लढाऊ विमानांचा ताफा हटवला जात नाही, तोपर्यंत पाकिस्तानकडून हवाई तळ सुरु करण्यात येणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं. ज्याकरता पूर्वीय सीमेलगत असणारं पाकिस्तानचं हवाई तळ बऱ्याच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं. मार्च महिन्यातही काही काळसाठी हवाई तळ सुरु करण्यात आलं होतं. पण, त्यावरुन भारतीय उड्डाणांना झेपावण्यास मनाई होती. परिणामी अनेक उड्डाणांना पर्यायी हवाई मार्गाचा वापर करावा लागला होता.  या साऱ्याचा थेट बोजा हा प्रवासी, इंधन आणि विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनांच्या दरांमधेय होत होता.