सिंगापूर : तुम्हाला कुठं तातडीनं जायचं असेल तर टॅक्सी मिळवणं मोठं दिव्य असतं. आणि टॅक्सी मिळाली तरी वाहतूककोंडीमुळे तुम्ही वेळेवर इच्छित ठिकाणी पोहचाल की नाही ? याची शंका आहे. पण आता वाहतूककोंडी आणि टॅक्सी पकडण्याचं टेन्शन सोडा. कारण आता हवाई टॅक्सी आली आहे. ही टॅक्सी तुमच्या इमारतीच्या गच्चीवर उतरेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला हवं तिथं हवाई टॅक्सी काही मिनिटात नेऊ शकणार आहे.  त्यामुळे वाहतूक कोंडीची कटकटच राहणार नाही. सिंगापूरच्या मरिना बिचवर नुकताच वोलोकॉप्टरच्या हवाई टॅक्सीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. तीन मिनिटं या हवाई टॅक्सीनं उड्डाण केलं. अठरा प्रोपेलर असलेली ही टॅक्सी सुरक्षित आणि जलद प्रवासाची हमी देतेय. जर्मन कंपनीनं तयार केलेली ही टॅक्सीची येत्या काळात भारतातही चाचणी होणार आहे. 



यापूर्वी या टॅक्सीची दुबईतही चाचणी घेण्यात आली होती. दुबईतल्या चाचणीदरम्यान ही टॅक्सी दूरसंचालित करण्यात आली होती. लवकरच वोलोकॉप्टर व्यावसायिक उड्डाण भरेल. तेव्हा मुंबई दिल्ली आणि कोलकाताच्या आकाशातही हवाई टॅक्सी दिसतील. त्यामुळं येत्या काही काळात हवाईटॅक्सीने प्रवास करण्यासाठी सज्ज राहा.