आनंदाची बातमी, रशियाची सर्वात प्रभावी लस `Sputnik V`चं अपडेट वर्जन, फक्त सिंगल डोसची गरज, 80% टक्के प्रभावी
रशियन आरोग्य अधिकाऱ्यांनी Sputnik V कोरोना विषाणूच्या लसीच्या सिंगल डोजच्या वापरास मान्यता दिली आहे.
मॅास्को : रशियन आरोग्य अधिकाऱ्यांनी Sputnik V कोरोना विषाणूच्या लसीच्या सिंगल डोजच्या वापरास मान्यता दिली आहे. गुरुवारी याबाबतची माहिती लस उत्पादकांनी दिली आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने या लसीला तयार करण्यासाठी आर्थिक मदत केली होती. आरडीआयएफने निवेदनात म्हटले आहे की, 'Sputnik Light' 79.4 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे, तर ''Sputnik V''च्या दोन डोस 91.6 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहेत.
Sputnik Vच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर असे सांगण्यात आले आहे की, स्पुतनिक लाईट वापरुन लसीकरणाला वेग आणता येईल आणि यामुळे साथीच्या या महामारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. अर्थात स्पुतनिक व्ही ही तशी मुख्य लस आहे, परंतु Sputnik Lightचे स्वतःचे एक वैशिष्ट आहे.
ट्वीटर पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, स्पुतनिक व्हीला यापूर्वीच एकूण 64 देशांमध्ये वापरासाठी मान्यता मिळाली आहे, ज्याची एकूण 3.2 अब्जपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. पण स्पुतनिक लाईट हे या महामारीपासून स्वतंत्रं होण्यासाठी हलके पाऊल उचलल्या प्रमाणे आहे.
पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, स्पुतनिक लाईट ही महामारीसोबत वेगवान गतीने लाढणारी एक विश्वसनीय लस आहे. याच्या मदतीने, जलद गतीने संरक्षण प्राप्त केले जाऊ शकते, ज्यामुळे व्हायरसचा वेगाने पराभव होऊ शकतो. 5 डिसेंबर 2020 ते 15 एप्रिल 2021 दरम्यान रशियाच्या लसीकरण मोहिमेदरम्यान लसीच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी याचा उपयोग केला गेला. ज्यामध्ये लोकांना लस दिल्यानंतर 28 दिवसांनी त्याचा डेटा गोळा करण्यात आला.
रशियन लसीला आता 60 पेक्षा अधिक देशांमध्ये वापरासाठी मंजूर दिली गेली आहे, परंतु अद्याप त्यांना युरोपियन औषधी एजन्सी आणि यूएस एफडीएकडून मान्यता मिळाली नाही.