नवी दिल्ली: छोटे मोठे मित्रांसोबत केलेले प्लॅन यशस्वी होत नाहीत. वर्ल्ड टूरचे बेत एक स्वप्नच राहातं. मात्र चक्क एका विषारी सापानं जगभ्रमंती केल्याची घटना समोर आली आहे. विषारी सापाने भारत ते इंग्लंड असा प्रवास केला आहे. यासंदर्भात एकाने फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिली आहे. एका शिपिंग कंटेनरमध्ये लपून हा साप थेट इंग्लंडमध्ये पोहोचला. तिथे सापाला पाहिल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार विषारी सापाला पकडण्यासाठी ब्रिटिश प्राणी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आलं. त्याला पकडता विशेष काळजी घ्यावी लागणार होती. इंग्लंडच्या दक्षिण एसेक्स वन्यजीव रुग्णालयाने फेसबुक पोस्टद्वारे या घटनेची माहिती दिली आहे.


रुग्णालयाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्यांना शिपिंग कंटेनरमध्ये लपलेल्या सापाला पकडण्यासाठी भारताकडून फोन आला होता. हॉस्पिटलने आपली टीम पाठवली ज्यात सर्प तज्ज्ञ आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांचा समावेश आहे. या टीमने लगेच ओळखलं की हा साप इंग्लंडमध्ये सापडत नाही. फेसबुक पोस्टमध्ये असे लिहिलं आहे की, "आज येणाऱ्या अनेक ब्रिटिश वन्यजीवांच्या प्रजातींव्यतिरिक्त, आम्हाला सापाबद्दल देखील कॉल आला जो तो ज्या देशात असायला हवा होता तो तिथे नाही."


या विषारी सापाला पकडण्यात आलं आहे. त्याला मानवी संपर्कापासून दूर ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हा साप कंटेनरमध्ये लपून आला होता. याची माहिती फेसबुकवर व्हायरल होताच अनेकांनी तिथल्या आरोग्य यंत्रणेचं कौतुक केलं आहे. ज्यांनी या सापाला जीवदान दिलं. त्यामुळे या आरोग्य विभागाचं लोकांनी कौतुक केलं आहे.