ऑफिसमध्ये येऊन काम करु नका; ट्विटरकडून कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय
समाज माध्यमांमध्ये एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ समजल्या जाणाऱ्या ट्विटरकडून...
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून चीनसोबतच जवळपास साऱ्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण केलेल्या Corona Virusच्या संक्रमाणाचे थेट परिणाम हे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहायला मिळत आहेत. एकिकडे चीनमध्ये या व्हायरसचं थैमान पाहायला असतानाच आता साऱ्या जगभरात त्यापासून वाचण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहेत. यामध्ये मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्याही मागे राहिलेल्या नाहीत.
समाज माध्यमांच्या दुनियेमध्ये एक महत्त्वाचं व्यासपीठ समजल्या जाणाऱ्या ट्विटर twitter या समाज माध्यमासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मंगळवारी एक अतिशय महत्त्वाचा ई-मेल पाठवण्यात आला आहे. ज्यामध्ये कार्यालयात न येता आपल्या घरुनच काम करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. जवळपास ५ हजार कर्मचाऱ्यांना हा सल्ला देण्यात आला आहे.
ट्विटरच्या HR विभागाच्या प्रमुख जेनिफर क्रिस्ठी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आम्ही शक्य ते सर्ल प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जगभरात आमच्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आम्ही घरुनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. हा निर्णय़ घेण्यापूर्वी हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरिया येथील कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगण्यत आलं होतं. पण, कोरोनाचं वाढतं प्रमाण पाहता आता आणखीही कर्मचाऱ्यांना अशाच सल्ला देण्यात आला आहे.
ट्विटर, फेसबुक आणि गूगल यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्यांना अनेकदा इतर देशांमध्ये प्रवास करावा लागतो. त्यामुळे या विषाणूचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच सध्या ट्विटरकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत
चीनमागोमाग आता युरोपातही कोरोनाचा संसर्ग होत असल्याची बाब समोर आली आहे. आतापर्यंत ३ हजारजणांना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे भीतीचं वातावरण आहे.