कोलंबो​ : गेल्या काही वर्षांपासून श्रीलंका आर्थिक संकटात आहे, परंतु सध्याची परिस्थीती आणखी भयावह रूप धारण करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जर पुढील 1 ते 2 वर्षात श्रीलंका दिवाळखोर देश म्हणून घोषीत झालं तर त्यात काही आश्चर्यवाटण्यासारखे नाही. तसे पाहाता श्रीलंका क्षेत्रफळाच्या दृष्टीने तमिळनाडूच्या जवळपास निम्मे आहे. तर येथील लोकसंख्या सुमारे अडीच लाख आहे. श्रीलंकेच्या जीडीपीमध्ये पर्यटन क्षेत्राचे योगदान 10 टक्क्यांहून अधिक आहे. परंतु कोविड महामारीमुळे आता तेथील संपुष्टात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यात श्रीलंका चीनकडून घेतल्या कर्जामुळे संपूर्ण कर्जात बुडाला आहे. त्यात चीनला कर्जाची परतफेड न केल्यामुळे आता श्रीलंकाचं हंबनटोटा बंदर चीनला 100 वर्षांच्या लीजवर द्यावे लागले. पण एवढे होऊन देखील चिनी कर्जाचा शेवट झाला नाही.


वाढती महागाई


श्रीलंकाl महागाई विक्रमी पातळीवर वाढत आहे. दररोजचे खाणेपिणेही लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. सरकारी खजिना जवळपास रिकामा आहे.


श्रीलंकेचे सरकार राजपक्षे कुटुंबीयांच्या नेतृत्वाखाली आहे. एक भाऊ गोटाभया राजपक्षे राष्ट्रपती आहेत आणि दुसरा भाऊ महिंद्र राजपक्षे पंतप्रधान आहेत. सर्व महत्त्वाच्या अधिकार राजपक्षे कुटुंबाकडे मर्यादित आहेत.


कोविड महामारी, पर्यटन उद्योगाचा ऱ्हास, वाढता सरकारी खर्च आणि सततची करकपात यामुळे सरकारी तिजोरी रिकामी झाली आहे. यासोबतच कर्जाच्या परतफेडीचा दबावही वाढत आहे. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार, महामारी सुरू झाल्यापासून पाच लाख लोक दारिद्र्यरेषेखाली गेले आहेत. नोव्हेंबरमध्ये महागाई विक्रमी 11.1% वर पोहोचली होती. डिसेंबरमध्ये अन्न आणि पेय 22.1 टक्क्यांनी महागले.


श्रीलंकेला आता खाण्यापिण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. आयातीद्वारे खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्यासाठी पुरेसा पैसा नाही. श्रीलंकेतील लोकांना दिवसातून तीनवेळाचं जेवणही कठीण झाले आहे.


श्रीलंकेच्या राजपक्षे सरकारने गेल्या वर्षीच आर्थिक आणीबाणी जाहीर केली होती. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्याची जबाबदारी लष्कराला देण्यात आली होती. साखर आणि तांदळाचे सरकारी भावही ठरवून दिले होते, पण त्यातूनही लोकांच्या अडचणी संपल्या नाहीत.


श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील अनुरुद्ध परंगमा नावाच्या टॅक्सी चालकाने ब्रिटीश वृत्तपत्र द गार्डियनला सांगितले की, तो कारचे कर्ज फेडण्यासाठी इतर गोष्टी देखील करत आहे, परंतु तरीही ते अपुरे पडत आहे. तो म्हणाला, "माझ्यासाठी कारचे कर्ज फेडणे खूप कठीण आहे. वीज, पाणी, अन्न या खर्चानंतर कारचे कर्ज फेडण्यासाठी काहीच उरत नाही. माझे कुटुंब तीन वेळेच्या ऐवजी फक्त दोन वेळचे अन्न खात आहे."


अन्न संकट


तेथील एका व्यक्तीने परिस्थिती सांगण्यासाठी उदाहरण दिले. ते म्हणाले, "माझ्या गावातील दुकानात एक किलो दूध पावडरचे पॅकेट अनपॅक करून 100 ग्रॅमचे पॅक तयार केले जातात कारण  लोकं एक किलोचे पॅकेट देखील विकत घेऊ शकत नाहीत. आता आम्ही 100 ग्रॅमपेक्षा जास्त कडधान्य खरेदी करू शकत नाही.


पर्यटनामुळे श्रीलंकेत परकीय चलन आले आणि लोकांना रोजगारही मिळाला, पण कोविड महामारीने तेही नष्ट केले. वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कॉन्सिलनुसार, श्रीलंकेतील दोन लाखांहून अधिक लोकांनी पर्यटन क्षेत्रातील नोकऱ्या गमावल्या आहेत.