वयात येणाऱ्या मुलीसोबत आईला करावं लागतं क्रूर कृत्य; पोटच्या लेकिलाच माय देते असह्य वेदना
World News : असं म्हणतात की लेकरु आईच्याच कुशीत सुरक्षित असतं. समाज म्हणू नका किंवा रुढी लेकरांना त्यांची माय मोठ्यातल्या मोठ्या संकटातून सावरण्याचं बळ देते. पण, जगात एक असाही देश आहे जिथं हीच माय त्यांच्या मुलींना आयुष्यभराच्या वेदना देते.
World News : असं म्हणतात की लेकरु आईच्याच कुशीत सुरक्षित असतं. समाज म्हणू नका किंवा रुढी लेकरांना त्यांची माय मोठ्यातल्या मोठ्या संकटातून सावरण्याचं बळ देते. पण, जगात एक असाही देश आहे जिथं हीच माय त्यांच्या मुलींना आयुष्यभराच्या वेदना देते. लेकिवर कोणाची वाईट नजर पडू नये, तिच्या अब्रूचे लचके नराधमांनी तोडू नयेत यासाठी या देशातील माता मुलींशी क्रूर कृत्य करतात. बरं, वेदना कितीही असह्य झाल्या तरीही या मुली चकार शब्दही काढत नाहीत. आपण, कमकुवत नाही हेच त्यांना दाखवून द्यायचं असतं. (South Africa woman faced brutal tradition as their mothers use breast ironing technique )
कोणत्या देशात चालतं हे क्रूर कृत्य? (breast ironing)
आफ्रिकेतील (Africa) गिनियन गल्फमध्ये असणाऱ्या कॅमरुनमध्ये ही प्रथा पाहायला मिळते. जिथं मुली वयात येताना त्यांचं तारुण्यच लपवलं जातं. 15 मिलियन इतकी लोकसंख्या असणाऱ्या कॅमरुनमध्ये 250 हून अधिक आदिवासी प्रजाती आहेत. इथं बऱ्याच विचित्र प्रथा आहेत. त्यातलीच एक म्हणजे ब्रेस्ट आयर्निंग (Breast Ironing).
इथं लेकी वयात येत असल्याचं कळताच त्यांचे स्तन विकसित होऊ नयेत यासाठी ब्रेस्ट आयर्निंग केली जाते. मुलगी वयात येताना अनेक माता दगड गरम करून तो स्तनांवर डागतात जेणेकरुन ते वाढणार नाहीत. ऐकून अंगावर शहारा येईल, पण हेच दाहक वास्तव आहे.
या प्रक्रियेमध्ये दगड किंवा चमचा गरम करुन तो मुलींच्या स्तनांवर अशा पद्धतीनं दाबला जातो, ज्यामुळं चे सपाट होतील. या प्रक्रियेतून मुलींना अनेक महिने पुढे जावं लागतं. ज्या मुली यादरम्यान रडतील त्यांच्या कुटुंबासाठी ही बाब लाजिरवाणी असते. त्यामुळं वेदना कितीही असह्य असल्या तरीही या लेकी चकार शब्दही काढत नाहीत.
नराधमांच्या भेदक नजरांपासून वाचण्यासाठी हे सर्व...
मुली वयात येताना अनेकदा काही नराधमांच्या नजरा त्यांच्यावर पडून अत्याचार होऊ नयेत आणि त्यांना लग्नाआधीच या अवहेलनांचा सामना करावा लागू नये यासाठी ब्रेस्ट आयर्निंग केलं जातं
वाचा : किती ते दुर्दैव! ज्या व्यक्तीच्या आयुष्यावर साकारला चित्रपट, त्याचा एअरपोर्टवरच दुर्दैवी अंत
वेदना आयुष्यभर सोबतच राहते...
BBC च्या वृत्तानुसार ब्रिटनमध्येही अशा घटनांची नोंद करण्यात आली आहे. जिथं तरुणींना ब्रेस्ट आयर्निंगला सामोरं जावं लागलं आहे. कित्येकिंना यामुळं आयुष्यभराच्या नैराश्याचाही सामना करावा लागला आहे. कॅमरुनमधील लिटोरल प्रांतात या जीवघेण्या प्रथेला आजही अवलंबात आणलं जातं. साधारण 53 टक्के मुली याला बळी पडतात. जग कितीही पुढे जात असलं, कितीही विकासाच्या वाटांवर धावत असलं तरीही यामध्ये आजही समाजात काही असे वर्ग आहेत ज्यांच्या वाट्याचा अंधकार अद्यापही दूर झालेला नाही. समाजातीलच काही घटक यासाठी जबाबदार आहेत हेसुद्धा तितकंच खरं, नाही का?