Bonus After Child Birth: मुलं जन्माला घातल्यानंतर त्यांच्यावर होणार खर्च कसा करायचा? हा मोठा प्रश्न पालकांना पडलेला असतो. पण अशीदेखील एक कंपनी आहे. जी आपल्या कर्मचाऱ्यांना मुलांना जन्म देण्यासाठी प्रोत्साहन देते. बरं हा बोनस एक-दोन लाख रुपये नाहीय तर तब्बल 65 लाख रुपये आहे. अशी कोणती कंपनी आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण कोरियातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बर्थ प्रोग्राम हाती घेतला आहे. याअंतर्गत मुले जन्माला घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना 75 हजार डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयानुसार साधारण 65 लाख 17 हजार रुपये इतका बोनस मिळणार आहे. 


देशातील घटता जन्मदर बनलाय अडचण 


दक्षिण कोरियामध्ये पुढच्या काही वर्षात देशातील जन्मदर रेकॉर्डच्या खालच्या स्तरावर येण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियातील कमी लोकसंख्या हे तिथल्या शासनासमोर आव्हान बनत चालले आहे. 


प्रजनन दर जगात सर्वात कमी


यावर्षी प्रत्येक महिलेमागे बाळांची संख्या कमी होऊन 0.72 इतकी झाली आहे. 2025 पर्यंत ही संख्या आणखी कमी होऊन 0.65 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियातील प्रजनन दर जगातील सर्वात कमी आहे. अशा स्थितीत जास्त मुले असावीत यासाठी देशातील कंपन्यादेखील आग्रही आहेत. याचा एक भाग म्हणून कंपन्यांनी नवी पॉलिसी बनवली आहे.  


ऑफिसमध्ये अफेअर ठेवून 65% जणांना मिळतो आनंद, आकडेवारी आली समोर 


खराब जन्मदर वाढवण्यासाठी


दक्षिण कोरियाच्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मुले जन्माला घालण्यासाठी 75 हजार डॉलर इतका बोनस देणार आहे. बूयॉन्ग ग्रुप आमि सॅंगबॅंगवूलने  या महिन्यात आपल्या कार्यालयात नव्या बर्थ प्रोग्रामची घोषणा केली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार देशातील खराब जन्मदर वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.


महिलांच्या चिडचिडेपणाला हार्मोनल बदल कारणीभूत? कसे ओळखायचे?